शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

‘तालिबान राजवटीस मान्यता देणे ही चूक’

By admin | Updated: December 6, 2014 00:05 IST

अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला पाकिस्तानने मान्यता दिली होती. पाकिस्तानची ही मोठी चूक होती, असे आता माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ म्हणत आहेत.

कराची : अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला पाकिस्तानने मान्यता दिली होती. पाकिस्तानची ही मोठी चूक होती, असे आता माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ म्हणत आहेत. अल काईदाचा उदय पाश्चिमात्य राष्ट्रांमुळे झाला, असा ठपकाही त्यांनी ठेवला आहे. कराची येथे ते युथ पार्लमेंटमध्ये मुशर्रफ बोलत होते. अफगाणिस्तानात १९९६ ते २००१ या कालावधीत तालिबान राजवट होती. या राजवटीला मान्यता देणारा जगातील एकमेव देश म्हणजे पाकिस्तान होता. सौदी अरेबिया व अरब अमिरात यांनी सुरुवातीला तालिबान राजवटीला पाठिंबा दिला; पण नंतर तो मागे घेतला. तालिबान राजवटीला पाठिंबा दिल्यानंतर १८ वर्षांनी मुशर्रफ यांनी तालिबानच्या क्रूर राजवटीला मान्यता देणे ही मोठी चूक ठरल्याचे मान्य केले आहे. अफगाणिस्तानवर सोविएत युनियनने आक्रमण केले होते. या आक्रमणाने जगातील राजकीय वातावरण बदलले. त्या काळात अमेरिकेने तीन महाचुका केल्या. (वृत्तसंस्था)रशियाने माघार घेतल्यानंतर अमेरिकेनेही माघार घेतली ही एक त्यातील चूक आहे, असे मुशर्रफ (७१) म्हणाले. पाकिस्तानात मुशर्रफ यांनी १९९९-२००८ पर्यंत सत्ता राबविली. अमेरिकेच्या महाचुका १) रशियाशी लढणाऱ्या २५ हजार अफगाण मुजाहिदीनांचे पुनर्वसन न करणे२) तालिबानला संघटना म्हणून मान्यता न देणे. पाकिस्तानने तालिबान राजवटीला मान्यता दिल्यामुळे जगात पाकिस्तानची प्रतिमा नकारार्थी झाली. ३ ) अमेरिका व नाटो सैन्याने अफगाणिस्तानवर हल्ला केल्यामुळे तालिबान व इतर दहशतवादी डोंगराळ भागाकडे गेले. तालिबानची निर्मिती अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे झाली. तालिबान हे पाकिस्तानचे पुत्र असल्याचा आरोप चुकीचा आहे, असेही मुशर्रफ यावेळी म्हणाले.