शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अनेक वर्षांपासून फरार होता रेपचा आरोपी, लोकांना वाटलं मेला; कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर पकडला गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 13:17 IST

Scotland : रॉसी स्कॉटलॅंडमध्ये एका काल्पनिक नावाने राहत असण्याबाबत समजलं होतं. आता त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे

अमेरिकेतील एक व्यक्ती शिक्षा वाचवण्यासाठी आपल्या मृत्यूचं नाटक करून अनेक वर्षांपासून फरार होता. पण त्याला कोविड -१९ ची लागण  झाल्याने त्याला स्कॉटलॅंडच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. तेव्हा त्याची खरी ओळख समोर आली आणि तो पकडला गेला. यूटा काउंटी (Utah County) अटॉर्नी ऑफिसने सांगितलं की, निकोलस रॉसी (Nicholas Rossi) ज्याला निकोलस अलहवर्डियन (Nicholas Alahverdian) नावानेही ओळखलं जातं. त्याला २००८ मध्ये यूटामध्ये एका लैंगिक शोषण आणि २०१८ मध्ये ओहियोमध्ये एका हल्ल्याच्या आरोपात पोलीस शोधत होते. पण तो तेव्हापासूनच फरार होता.

कोरोनामुळे झाला त्याचा भांडाफोड

'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, २९ फेब्रुवारी २०२० ला त्याच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली होती. पण आता असा खुलासा झाला आहे की, तो फरार झाल्यावर आर्थर राइट नावाने ग्लासगोमध्ये राहत होता आणि नुकतंच त्याला कोरोनाची लागण झाल्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

यूटा काउंटी अटॉर्नी कार्यालयाने सांगितलं की, 'रॉसी स्कॉटलॅंडमध्ये एका काल्पनिक नावाने राहत असण्याबाबत समजलं होतं. आता त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे आणि यूटा काउंटी कार्यालयाने रॉसीला परत यूटामध्ये प्रत्यार्पित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सीसोबत काम सुरू आहे'.

प्रॉसिक्यूटरने सांगितलं की, रॉसी चौकशी आणि शिक्षेपासून वाचण्यासाठी अमेरिकेतून पळून गेला होता आणि इतर राज्यातील चौकशी समित्या व राज्याच्या पोलिसांना हा विश्वास देण्याचा प्रयत्न केला की, त्याचा मृत्यू झाला आहे'.

रॉसीच्या वकिलालाही झाला नाही विश्वास

रॉसीचे वकील जेफरी पाइन म्हणाले की, 'मी तुम्हाला खोटं सांगणार नाही. मला रॉसीचा मृत्यू संशयास्पद वाटला होता. पण तरीही मी त्याच्या पत्नीचं म्हणणं मानलं. मला हे म्हणून कुणाचाही अपमान करायचा नव्हता की, तो मेलेला नाही. म्हणून मी त्याची केस घेतली'.

हे पण वाचा : 

मोदींना भेटताना असा शर्ट का घातला होता? राकेश झुनझुनवालांनी सांगितलं खरं कारण! 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या