ऑफिस ट्रिप असल्याचं सांगून थायलंडला गेला, तिथे गर्लफ्रेंडसोबत सापडला, असं फुटलं रंगेल नवऱ्याचं बिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 10:10 IST2025-12-06T10:09:40+5:302025-12-06T10:10:21+5:30
Thailand News: एक मलेशियन व्यक्ती सहकाऱ्यांसह बिझनेस ट्रिपसाठी जात असल्याचं पत्नीला सांगून मैत्रिणीसोबत थायलंडला फिरायला गेला होता. तिथे हे दोघेही मौजमजा करत असताना अचानक आलेल्या भीषण पुरामध्ये अडकले.

ऑफिस ट्रिप असल्याचं सांगून थायलंडला गेला, तिथे गर्लफ्रेंडसोबत सापडला, असं फुटलं रंगेल नवऱ्याचं बिंग
मौजमजा करण्यासाठी थायलंडला जाणाऱ्या मंडळींची संख्या कमी नाही. त्यातील काही जण तर वेगळेगळी कारणं देऊन थायलंडला जातात. अशीच एक घटना समोर आली आहे. एक मलेशियन व्यक्ती सहकाऱ्यांसह बिझनेस ट्रिपसाठी जात असल्याचं पत्नीला सांगून मैत्रिणीसोबत थायलंडला फिरायला गेला होता. तिथे हे दोघेही मौजमजा करत असताना अचानक आलेल्या भीषण पुरामध्ये अडकले.
सदर व्यक्ती पत्नीसोबत सातत्याने बोलत असल्याने तिलाही त्याच्यावर संशय आला नाही. दरम्यान, मुसळधार पावसामुळे आलेल्या भीषण पुराचा फटका दक्षिण थायलंडला बसला. यात ८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेत दक्षित थायलंडमधील सर्वात मोठं शहर असलेल्या हाय याई सह १२ प्रांतातील ३० लाख लोकांना या पुराचा फटका बसला.
दरम्यान, हाट याई येथील मदतकार्यासंबंधीचे अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या आणि त्या माध्यमातून पुरात अडकलेल्यांची त्यांच्या नातेवाईकांशी भेट घडवून आणणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन कार्यकर्ता असलेल्या एक मलेशियन महिलेने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात या महिलेने लिहिले की, २४ नोव्हेंबर रोजी एका मलेशियन महिलेने तिच्या पतीचा शोध घेण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली होती. तिचा पती त्याच्या सहकाऱ्यांसह हाट याई शहरामध्ये अडकला असल्याची भीती तिने व्यक्त केली होती. तसेच तिची लहान मुले वडील घरी कधी येणार याची उत्सुकतेने वाट पाहत होते. दरम्यान, मी त्या शहरात राहणाऱ्या नातेवाईकांच्या मदतीने त्या महिलेचा पतीला एका हॉटेलमधून शोधून काढले.
मात्र सदर व्यक्तीची सहकारी एक महिला होती. आणि हे दोघेही चार दिवसांपासून हॉटेलमधील एकाच खोलीमध्ये राहत होते. या व्यक्तीने या गोष्टीची माहिती आतापर्यंत त्याच्या पत्नीला दिली नव्हती, असेही तिने या पोस्टमध्ये लिहिले.
दरम्यान, बचाव कर्मचारी असलेल्या सदर महिलिने तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून ही माहिती शेअर केली आहे. तसेच महिलांनी अधिक सावध राहावे आणि आपल्या पतींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही तिने केले.