बांगलादेशमध्ये राजस्थानच्या एमबीबीएस विद्यार्थिनीचा सापडला मृतदेह; परीक्षेत कॉपी केल्याचा होता आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 20:45 IST2025-10-01T20:45:11+5:302025-10-01T20:45:59+5:30

बांगलादेशात १९ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.

Rajasthan MBBS student dies in Bangladesh body awaited for 3 days | बांगलादेशमध्ये राजस्थानच्या एमबीबीएस विद्यार्थिनीचा सापडला मृतदेह; परीक्षेत कॉपी केल्याचा होता आरोप

बांगलादेशमध्ये राजस्थानच्या एमबीबीएस विद्यार्थिनीचा सापडला मृतदेह; परीक्षेत कॉपी केल्याचा होता आरोप

Dhaka Indian Student Death: बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करण्यात आलं होतं. अनेकांचा यामध्ये मृत्यू देखील झाला होता. भारताने या घटनांचा निषेध देखील नोंदवला होता. अशातच बांगलादेशमध्ये एका भारतीय वैद्यकीय विद्यार्थिनीचा गूढ परिस्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. १९ वर्षीय निदा खान ही ढाक्याच्या दक्षिणेकडील केरानीगंज येथील अद-दीन मोमिन मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. निदा खान ही राजस्थानमधील झालावाडची रहिवासी होती.

२९ सप्टेंबर रोजी निदा अद-दीन मोमिन मेडिकल कॉलेजमधील तिच्या वसतिगृहाच्या खोलीत मृतावस्थेत आढळली होती. ढाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निदाने २८ सप्टेंबर रोजी परीक्षा दिली होती. या परीक्षेत निदा कॉपी करताना पकडली गेली होती. त्यामुळे तिला कॉलेजमधून निलंबित करण्यात आले. कॉलेजमध्ये काढून टाकल्याने निदाने आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे. या घटनेची माहिती भारतीय दूतावासाला कळवण्यात आली.

"आम्हाला पहाटे ४:१५ वाजता माहिती मिळाली. १९ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी निदा खानचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. कॉलेज अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले की कॉपी करताना पकडल्यानंतर तिला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले आहे," अशी माहिती ढाका पोलिसांनी दिली.

दुसरीकडे, कॉलेज व्यवस्थापनाने  दिलेल्या माहितीनुसार निदा २७ सप्टेंबर रोजी उशिरा तिच्या खोलीत परतली. तिच्या मित्रांनी तिला अनेक फोन केले पण तिने कोणचाही फोन उचलला नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास कॉलेज व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यानंतर तिची खोली चावीने उघडण्यात आली. खोलीत ती मृतावस्थेत होती.

या घटनेनंतर ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशनने परराष्ट्र मंत्रालयाला हस्तक्षेप करून कारवाई करण्याची विनंती केली आहे. "मोठ्या दुःखाने, मी तुम्हाला कळवू इच्छितो की बांगलादेशातील मोमिन मेडिकल कॉलेजची १९ वर्षांची विद्यार्थिनी निदा खान हिचा मृत्यू झाला आहे. तिने अत्यंत दुःखद परिस्थितीत आत्महत्या केली. या कठीण आणि दुःखाच्या वेळी, निदाच्या कुटुंबाची एकच इच्छा आहे की तिचे अंतिम संस्कार तिच्या मायदेशी (म्हणजे भारतात) व्हावेत. मात्र, तिचे पार्थिव शरीर भारतात परत आणण्यासाठी त्यांना अनेक अडचणी येत आहेत, असं पत्र ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशनने परराष्ट्र मंत्र्यांना लिहिले. निदा खानच्या कुटुंबीयांनीही सरकारला तिचे पार्थिव लवकरात लवकर भारतात आणण्याची विनंती केली आहे.

Web Title : बांग्लादेश में भारतीय मेडिकल छात्रा मृत पाई गई; परीक्षा में नक़ल का शक।

Web Summary : बांग्लादेश में राजस्थान की निदा खान मृत मिलीं। परीक्षा में नक़ल करते पकड़े जाने और निलंबन के बाद संदेह बढ़ गया। परिवार पार्थिव शरीर को वापस लाने की मांग कर रहा है।

Web Title : Indian medical student found dead in Bangladesh; cheating suspected.

Web Summary : Rajasthan's Nida Khan, studying medicine in Bangladesh, was found dead. Suspicion arose after she was allegedly caught cheating during an exam and suspended. Family seeks repatriation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.