रशियाच्या भूमिकेबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत फोनवरून झालेल्या चर्चेनंतर बोलताना त्यांनी याची माहिती दिली. इराण विरुद्ध इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी पुतीन मदत करू इच्छितात, असे ट्रम्प यांनी सांगितले.
२८ फेब्रुवारी २०२६ पासून इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. याचदरम्यान ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा केली. इराणसोबत सुरू असलेले युद्ध थांबवण्याबद्दल ट्रम्प म्हणाले, "इराणमधील अमेरिकन लष्कराची मोहीम लवकरच संपू शकते. पण, या आठवड्यात हे थांबवणार नाही."
पुतीन-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली?
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, "युक्रेनसोबत सोबत सुरू असलेल्या युद्धावरही यावेळी चर्चा झाली. युक्रेनचे युद्ध हे एक असा संघर्ष आहे, जो संपताना दिसत नाहीये. राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात कट्टर वैर आहे आणि ते कोणत्याही तोडग्यापर्यंत पोहोचत नाहीये."
"मला वाटतं की आमची त्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. आमची मध्य पूर्वेतील परिस्थितीवरही चर्चा झाली. पुतीन मदत करू इच्छितात. मी पुतीन यांना म्हणालो की, जर तुम्ही युक्रेनसोबतचे युद्ध संपवण्यासाठी मदत केली, तर ते जास्त फायदेशीर ठरेल", असे ट्रम्प यांनी सांगितले.
मोजतबा खामेनेईच्या निवडीवर ट्रम्प नाराज
इराणच्या सर्वोच्च नेतेपदी अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीवर डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. मी या निवडीवर खूश नाही, असे सांगतानाच ट्रम्प म्हणाले की, इराणचा नवीन सर्वोच्च नेता ज्या नावाची चर्चा होत आहे, त्यांना फार लोक ओळखत नाही.
पुतीन यांनी केले अभिनंदन
दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मोजतबा खामेनेई यांची सर्वोच्च नेते पदी झालेल्या निवडीचे स्वागत केले आहे. त्यांनी खामेनेई यांचे अभिनंदनही केले आहे.
पुतीन म्हणाले होते की, "तेहरानला रशियाचे अखंड समर्थन असणार आहे आणि इराणसोबतच्या मैत्रीला आणखी दृढ करण्यावर भर देईल. आम्ही वचन देतो की रशिया एक विश्वासू साथीदार राहील."
Web Summary : Trump disclosed Putin offered help to end the Iran-Israel conflict. Discussions also covered Ukraine, with Trump suggesting Putin focus on resolving that war first. Trump expressed displeasure over Khamenei's son's selection as Iran's Supreme Leader, while Putin welcomed it.
Web Summary : ट्रम्प ने खुलासा किया कि पुतिन ने ईरान-इजरायल संघर्ष को समाप्त करने में मदद की पेशकश की। चर्चा में यूक्रेन भी शामिल था, ट्रम्प ने सुझाव दिया कि पुतिन पहले उस युद्ध को हल करने पर ध्यान दें। ट्रम्प ने खामेनेई के बेटे के ईरान के सर्वोच्च नेता के रूप में चयन पर नाखुशी व्यक्त की, जबकि पुतिन ने इसका स्वागत किया।