शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

'कोविडसारखी परिस्थिती पुन्हा येईल!'; पुतिन यांनी रशियन उद्योजकांना केले सावध...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 09:50 IST

Putin on Iran War 2026 : व्लादिमीर पुतिन यांचा इशारा: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम कोविड महामारीसारखाच असेल. जागतिक पुरवठा साखळी आणि ऊर्जा संकट गडद होण्याची भीती.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्कोमध्ये उद्योजकांशी संवाद साधताना मध्यपूर्वेतील युद्धावर चिंता व्यक्त केली आहे. "या युद्धाचे परिणाम किती खोलवर होतील, हे सांगणे सध्या कठीण आहे, मात्र काही अंदाजांनुसार याचा जागतिक परिणाम कोविड महामारीसारखाच असेल," असे पुतिन यांनी म्हटले आहे.

पुतिन यांच्या मते, ज्याप्रमाणे कोरोनाने सर्व खंडांमधील विकास ठप्प केला होता, तसेच हे युद्ध आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक, उत्पादन आणि पुरवठा साखळी उद्ध्वस्त करत आहे. या युद्धामुळे हायड्रोकार्बन (तेल-गॅस), धातू आणि विशेषतः खते निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर प्रचंड दबाव आला आहे. यामुळे भविष्यात अन्नाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

पुतिन यांनी रशियन तेल कंपन्यांना इशारा दिला आहे की, सध्या कच्च्या तेलाचे दर वाढल्याने होणारा नफा हा तात्पुरता असू शकतो. त्यामुळे 'विंडफॉल प्रॉफिट' (अनपेक्षित नफा) पाहून सरकारी बजेटमध्ये मोठी वाढ करणे किंवा लाभांश उधळणे धोकादायक ठरू शकते.

आर्थिक 'पॅरालिसिस'ची भीतीरशियन तज्ज्ञांच्या मते, जर 'होरमुझची सामुद्रधुनी' दीर्घकाळ बंद राहिली, तर जागतिक अर्थव्यवस्थेला अर्धांगवायू होऊ शकतो, कारण आशिया आणि युरोपचा मोठा व्यापार याच मार्गावर अवलंबून आहे.

रशियाची भूमिकाएकीकडे पुतिन शांततेचे आवाहन करत असले, तरी रशियाची इंधन कमाई वाढली आहे. रशिया सध्या दिवसाला सुमारे ७६० दशलक्ष डॉलर्स तेल आणि गॅस विक्रीतून कमवत आहे. दरम्यान, पुतिन यांनी इराणच्या नेत्यांना 'नवरोज'च्या शुभेच्छा देत रशिया हा इराणचा 'विश्वासू मित्र' असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Putin Warns of COVID-like Crisis Due to Middle East Conflict

Web Summary : Putin cautions that the Middle East conflict could trigger a global crisis mirroring the COVID pandemic. He highlighted potential disruptions to logistics, supply chains, and commodity markets, urging Russian companies to avoid reckless spending despite rising oil prices. A prolonged closure of the Strait of Hormuz could paralyze the global economy.
टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरWarयुद्धrussiaरशिया