इराणमध्ये खामेनींविरोधात निदर्शने तीव्र, ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे 'Gen-Z' चा उत्साह वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 11:09 IST2026-01-03T10:51:54+5:302026-01-03T11:09:58+5:30
इराणमधील आर्थिक संकट आणि विक्रमी महागाईमुळे सरकारविरुद्ध निदर्शने सुरू झाली आहेत. देशभर अशांतता पसरली आहे, यामुळे असंख्य निदर्शकांचा मृत्यू आणि अटक झाली आहे.

इराणमध्ये खामेनींविरोधात निदर्शने तीव्र, ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे 'Gen-Z' चा उत्साह वाढला
मागील काही दिवसांपासून इराणमध्ये सरकारविरोधात निदर्शने सुरू आहे. Gen-Z रस्त्यावर उतरली आहे. परिस्थिती बिकट होत आहे. देशभरात सरकारविरुद्ध निदर्शने सातत्याने वाढत आहेत. इराणमधील वाढत्या आर्थिक संकटावर लोकांचा रोष वाढत आहे. २८ डिसेंबरपासून निदर्शने सुरू झाली. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निदर्शनांना पाठिंबा दिला आहे. यामुळे Gen-Z चा उत्साह आणखी वाढला आहे.
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामाचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
अमेरिकास्थित ह्युमन राईट्स अॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सी नुसार, इराणमध्ये निदर्शने सुरूच आहेत. लोकांनी आपली दुकाने बंद केली आहेत. निदर्शने वेगाने पसरत आहेत, रस्त्यावर गर्दी जमत आहे, घोषणाबाजी करत आहेत आणि आग लावत आहेत. किमान आठ निदर्शकांचा मृत्यू झाला आहे आणि डझनभर लोकांना अटक करण्यात आली आहे.
११३ ठिकाणी निदर्शने
रविवारी, आर्थिक संकट, वाढती महागाई आणि घसरत्या चलनामुळे देशात जनतेचा रोष उफाळून आला. तेहरानमधील लोकांनी आपली दुकाने बंद ठेवली, यामुळे सरकारविरुद्ध निदर्शने झाली. तेहरानमधील बाजारपेठा बंद पडण्यापासून सुरू झालेले निदर्शने आता वाढत आहेत. ही अशांतता आता २२ प्रांतांमधील ४६ शहरांमधील ११३ ठिकाणी पसरली आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा दलांकडून होणारा हिंसाचार आणि आणखी अटकेदरम्यान मशहद, झाहेदान, काझविन, हमादान आणि तेहरानसह अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरूच असल्याचे HRANA ने वृत्त दिले आहे.
ट्रम्प यांनी इशारा दिला
इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही एक निवेदन जारी केले आहे. ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, जर इराणने शांततापूर्ण निदर्शकांवर गोळीबार केला आणि हिंसकपणे त्यांना ठार मारले तर अमेरिका त्यांच्या मदतीला येईल.
ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि कारवाई करण्यास तयार आहोत." यानंतर, देशातील अनेक नेते ट्रम्प यांच्या विधानाविरुद्ध बोलत आहेत. दरम्यान, ट्रम्पच्या विधानाने Gen-Z उत्साहित झाले आहेत. ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणी कार्यकर्ते मसीह अलिनेजाद यांनी इराणी राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यावर तीव्र टीका केली.