"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 10:20 IST2026-01-07T10:20:27+5:302026-01-07T10:20:56+5:30
ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांतील संबंध आजही चांगले असले तरी, रशियन तेलाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे पंतप्रधान मोदी नाराज आहेत. ट्रम्प हाउस जीओपी मेंबर रिट्रीट दरम्यान बोलत होते.

"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?
भारत-US संबंधांसंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी, रशियन तेलाच्या खरेदीवरून निर्माण झालेल्या तणावासंदर्भात भाष्य करताना ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांतील संबंध आजही चांगले असले तरी, रशियन तेलाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे पंतप्रधान मोदी नाराज आहेत. ट्रम्प हाउस जीओपी मेंबर रिट्रीट दरम्यान बोलत होते.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लादले आहे. यातील २५ टक्के टॅरीफ रशियन तेलाच्या खरेदीमुळे लादण्यात आले आहे. ट्रम्प म्हणाले, "मोदींना माहिती होते की मी नाराज आहे आणि ते मला खुश करण्याचाही प्रयत्न करत होते."
रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना, भारत तेल खरेदी करून अप्रत्यक्षपणे रशियाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे, असा डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्षेप आहे. महत्वाचे म्हणजे, ट्रम्प स्वतः रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थ म्हणून सादर करत आहेत. यासंदर्भात त्यांनी पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केली आहे.
दरम्यान, आपल्या टॅरिफ नीतीचा अमेरिकेला मोठा फायदा होत आहे, तसेच, अमेरिका टॅरीफच्या फायदा आपल्या हितासाठी करत आहे, असेही टम्प म्हणाले.
दुसऱ्या बाजूला, भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट राहिली आहे. ट्रम्प यांनी, भारताने रशियन तेल खरेदी बंद करण्याचे आश्वासन दिल्याचा दावा भारताने आधीच फेटाळून लावला आहे. भारताने, कोणत्याही दबावाखाली तेल आयात बंद करण्याचा शब्द दिलेला नाही, हे स्पष्ट केले आहे.