शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

पंतप्रधानांच्या प्रभावी नियोजनाने कोरोनाला रोखले, निवडणुकीत जनतेने प्रचंड बहुमताने विजयी केले

By बाळकृष्ण परब | Published: October 17, 2020 5:37 PM

Jacinda Ardern News : न्यूझीलंडच्या इतिहासामध्ये निडणुकीत एवढे प्रचंड यश कुठलीही व्यक्ती आणि पक्षाला पहिल्यांदाच मिळाले आहे. त्याबरोबरच जसिंडा आर्डर्न पुन्हा एकदा न्यूझीलंडचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

ठळक मुद्देजसिंडा आर्डर्न यांच्या सेंटर-लेफ्ट पक्षाला एकूण ८७ टक्के मतदानापैकी ४८.९ टक्के मते मिळालीन्यूझीलंडमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल पार्टीला २७ टक्के मते मिळालीजसिंडा आर्डर्न या आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात विविध कारणांमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरल्या होत्या

वेलिंग्टन - संपूर्ण जगात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असताना न्यूझीलंडने कोरोनाविरोधात प्रभावी नियोजन करत या जीवघेण्या विषाणूला प्रतिबंध करण्यात यश मिळवले होते. कोरोनाविरोधातील प्रभावी नियोजनासाठी न्यूझीलंडच्यापंतप्रधान जसिंडा आर्डन यांचे कौतुक झाले होते. आता न्यूझीलंडमध्ये झालेल्या निवडणुकीत जसिंडा आर्डर्न यांना जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे.न्यूझीलंडमध्ये १९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, न्यूझीलंडच्या इतिहासामध्ये निडणुकीत एवढे प्रचंड यश कुठलीही व्यक्ती आणि पक्षाला पहिल्यांदाच मिळाले आहे. त्याबरोबरच जसिंडा आर्डर्न पुन्हा एकदा न्यूझीलंडचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.जसिंडा आर्डर्न यांच्या सेंटर-लेफ्ट पक्षाला एकूण ८७ टक्के मतदानापैकी ४८.९ टक्के मते मिळाली. देशाने लेबर पक्षाला ५० वर्षांतील सर्वाधिक पाठिंबा मिळाला आहे, असे जसिंडा यांनी सांगितले. मात्र देशासमोर अजून कठीण काळ येणार आहे. अशावेळी पक्ष प्रत्येक देशवासीयासाठी काम करेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, न्यूझीलंडमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल पार्टीला २७ टक्के मते मिळाली. २००२ नंतर निवडणुकीतील या पक्षाची ही सर्वात वाईट कामगिरी आहे.जसिंडा आर्डर्न या आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात विविध कारणांमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अन्य देशांमधील नेत्यांना त्यांच्याकडून शिकण्याचा सल्ला विरोधी नेत्यांकडून देण्यात येत असतो. जसिंडा यांच्या कार्यकाळात न्यूझीलंडमध्ये दहशतवादी हल्ल्यापासून नैसर्गिक आपत्तीपर्यंत अनेक संकटे आली. तसेच कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागला. मात्र या सर्वाचा यशस्वीपणे सामना केल्याबद्दल त्यांचे कौतुक झाले. जेव्हा जगभरातील मोठमोठे देश कोरोनासमोर गुडघे टेकत होते तेव्हा जसिंडा यांनी न्यूझीलंडमध्ये अचून नियोजन करून कोरोनाला रोखून दाखवले होते. आज मिळालेल्या यशामध्ये कोरोनाकाळातील त्यांच्यी कामगिरीचे मोठे योगदान असल्याचेही सांगण्यात येत आहे.

 

टॅग्स :New Zealandन्यूझीलंडprime ministerपंतप्रधानElectionनिवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्या