Russian President Vladimir Putin: जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक आणि नेहमीच आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा एक अत्यंत भावूक आणि मानवी चेहरा जगासमोर आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका विशेष गौरव समारंभात, पुतिन यांनी पॅरालिम्पिक चॅम्पियन इवान गोलुबकोव याला सन्मानित करताना चक्क त्याच्यासमोर गुडघे टेकले. प्रोटोकॉल बाजूला सारून पुतिन यांनी दाखवलेल्या या आदराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून जगभरातून त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.
काय आहे 'तो' ऐतिहासिक क्षण?
२०२६ च्या विंटर पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या रशियन खेळाडूंच्या सन्मानार्थ मॉस्कोमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुवर्णपदक विजेता इवान गोलुबकोव याला पदकाने सन्मानित करण्याची वेळ आली, तेव्हा इवानची शारीरिक स्थिती पाहून पुतिन यांनी स्वतः खाली झुकून त्याच्यासमोर गुडघे टेकले. एका एथलीटच्या जिद्दीला सत्ताधीशाने दिलेली ही मानवंदना पाहून सभागृहातील सर्वच आश्चर्यचकित झाले.
'ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप'ने गौरव
या सोहळ्यात इवान गोलुबकोव याला रशियाचा मानाचा ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशाचा मान उंचावणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध दृढ करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. इवानसोबतच त्याचे प्रशिक्षक इरिना ग्रोमोवा, अलेक्झांडर नाझरोव, अलेक्सी टर्बिन आणि अलेक्सी कोबेलेव यांनाही त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल गौरवण्यात आले.
इवान गोलुबकोवचा सुवर्ण पराक्रम
इवान गोलुबकोव याने २०२६ विंटर पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या १० किमी क्रॉस-कंट्री स्कीइंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. शारीरिक आव्हानांवर मात करत त्याने मिळवलेले हे यश केवळ रशियासाठीच नाही, तर जगातील सर्व पॅरा-एथलीट्ससाठी प्रेरणादायी ठरले आहे.
विंटर पॅरालिम्पिक २०२६
६ ते १५ मार्च २०२६ दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत रशियाने केवळ सहा एथलीट्सचा छोटा ताफा पाठवला होता. मात्र, या सहा वीरांनी अल्पाइन स्कीइंग, क्रॉस-कंट्री स्कीइंग आणि पॅरा-स्नोबोर्डिंगमध्ये अशी कामगिरी केली की बड्या देशांनाही घाम फुटला. पुतिन यांनी रशियन संघाचे अभिनंदन करताना म्हटले की, "आमची टीम छोटी होती, पण आमचा इरादा मोठा होता. रशियाच्या जिद्दीने पुन्हा एकदा सिद्ध केले की संख्येपेक्षा कौशल्य आणि जिद्द श्रेष्ठ आहे."
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
नेहमी लष्करी गणवेशात किंवा गंभीर मुद्रेत दिसणाऱ्या पुतिन यांचा हा हळवा कोपरा पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
Web Summary : President Putin knelt before Paralympian Ivan Golubkov, honoring his gold medal win at the 2026 Winter Paralympics. Golubkov received the Order of Friendship for his achievement. Putin praised the small Russian team's determination and skill.
Web Summary : राष्ट्रपति पुतिन ने पैरालिंपियन इवान गोलुबकोव के सामने घुटने टेके, 2026 शीतकालीन पैरालिंपिक में स्वर्ण पदक जीतने पर उन्हें सम्मानित किया। गोलुबकोव को उनकी उपलब्धि के लिए ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप मिला। पुतिन ने छोटी रूसी टीम के दृढ़ संकल्प और कौशल की प्रशंसा की।