शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक पराभवानंतरही राष्ट्राध्यक्ष ओबामा खंबीर

By admin | Updated: November 7, 2014 04:21 IST

मध्यावधी निवडणुकीत पराभवाचा फटका बसल्यानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा खंबीरपण कायम असून

वॉशिंग्टन : मध्यावधी निवडणुकीत पराभवाचा फटका बसल्यानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा खंबीरपण कायम असून, त्यांनी रिपब्लिकन पक्षाशी मिळतेजुळते घेऊन काम करण्याची तयारी दर्शविली आहे. पण स्थलांतर सुधारणासारख्या महत्त्वाच्या मुद्यावर आपण काँग्रेसला बाजूला ठेवू व ११ दशलक्ष बेकायदेशीर नागरिकांना (२.४ लाख भारतीय) कायदेशीर नागरिकत्व देऊन देशात राहण्याची परवानगी देऊ, असे म्हटले आहे. अमेरिकेचे भवितव्य उज्ज्वल आहे याबद्दल खात्री असल्याचे ओबामा यांनी आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात सांगितले. अमेरिका हा पृथ्वीवरील सर्वात उत्कृष्ट देश आहे. जगातील कोणत्याही देशापेक्षा चांगले पत्ते आपल्या हाती आहेत. अमेरिकेच्या भवितव्याबाबत मी आशावादी आहे. सध्या नागरिक अस्वस्थ आहेत हे मला माहीत आहे; पण वस्तुस्थिती पाहिली तर इतर कोणत्याही देशापेक्षा अमेरिकेची अर्थव्यवस्था अधिक समर्थ आहे, असे ओबामा म्हणाले. जगातील सर्वोत्कृष्ट बाबी स्वत:कडे खेचून घेण्याची क्षमता आजही अमेरिकेत आहे, अमेरिका एक चुंबक असून जगातील उत्कृष्ट व उज्ज्वल बाबी त्याकडे खेचल्या जातात. माझ्या कारकीर्दीची आणखी दोन वर्षे राहिली आहेत, या कालावधीत काहीतरी भरीव, बळकट काम करावे अशी माझी इच्छा आहे. हे काम काँग्रेसच्या साथीने, सहकार्याने करायचे आहे; पण जे काम काँग्रेसच्या सहकार्याने शक्य नसेल ते मी माझ्या हिमतीवर करीन. आपल्याला आत्मविश्वास असेल तर काहीही करता येते, नागरिकांना प्रगती व आशा यांची जाणीव देता येते, असे ओबामा म्हणाले. (वृत्तसंस्था)