शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:23 IST

जिथे शांततेला संरक्षणाची गरज आहे तिथे आम्ही सेवा देत राहू, फक्त शब्दांनी नाही तर जमिनीवर असलेल्या सैनिकांसह असं त्यांनी सांगितले. 

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र महासभेत मंगळवारी एक रंजक घटना पाहायला मिळाली. याठिकाणी जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीने हिंदू धर्मातील ओम शब्दाचा उल्लेख केला. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबिआंतो यांनी त्यांच्या भाषणाचा शेवट ओम शांती ओम असा केला. त्याशिवाय जगभरातील नेत्यांना एकत्रित येऊन काम करण्याचं आवाहनही त्यांनी केले. संयुक्त महासभेच्या ८० व्या सत्रात इस्रायल आणि पॅलेस्टाइन मुद्दा चर्चेचा विषय होता. विविध देशांच्या प्रतिनिधींनी या चर्चेत सहभाग नोंदवला. पॅलेस्टाइनला आतापर्यंत ५ देशांनी मान्यता दिली आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेत बोलताना इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबिआंतो यांनी म्हटलं की, जागतिक शांतता, न्याय आणि समान संधी सगळ्यांना मिळायला हवी. भीती, वंशवाद, द्वेष, दडपशाही आणि रंगभेदामुळे प्रेरित मानवी मूर्खपणा आपल्या सामायिक भविष्याला धोका निर्माण करतो. गाझा येथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी इंडोनेशियाची त्यांचे २० हजार सैन्य तिथे तैनात करण्याची तयारी आहे. आज इंडोनेशिया हा संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्यात सर्वात मोठा योगदान देणारा देश आहे. जिथे शांततेला संरक्षणाची गरज आहे तिथे आम्ही सेवा देत राहू, फक्त शब्दांनी नाही तर जमिनीवर असलेल्या सैनिकांसह असं त्यांनी सांगितले. 

प्रबोवो यांनी भाषणाची सुरुवात 'बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम' आणि 'अस्सलामु अलैकुम' सारख्या मुस्लिम अभिवादनाने केली. त्यानंतर त्यांनी अमेरिकन स्वातंत्र्य घोषणापत्रातील "सर्व माणसे समान आहेत" या तत्त्वाचा उल्लेख करून जागतिक समृद्धी आणि मानवाधिकारांच्या विकासाकडे लक्ष वेधले. इंडोनेशियाच्या वसाहतवादी काळातील दुःखद इतिहासाचा उल्लेख करताना त्यांनी यूएनच्या मदतीसाठी आभार मानले, ज्याने इंडोनेशियाला गरीबी, उपासमार आणि रोगांपासून मुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावली.

दरम्यान, प्रबोवो यांच्या भाषणाचा शेवट मात्र भावनिक होता. त्यांनी विविध धर्मांच्या अभिवादनांचा समावेश करून "वस्सलामु अलैकुम वरह्मतुल्लाही वबरकातुह, शालोम, ओम शांती, शांती ओम, नमो बुद्धाय. धन्यवाद...असं म्हणत प्रबोवो यांनी मुस्लिम, ज्यू, हिंदू आणि बौद्ध धर्मांचे प्रतिनिधित्व करत होते, त्यांच्यासमोर  बहुधार्मिक सद्भावनेचा संदेश दिला.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIndonesiaइंडोनेशियाMuslimमुस्लीमHinduहिंदू