शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

तालिबानी सत्तासंघर्षात, दोन्ही सर्वोच्च नेते गायब; पंतप्रधान ठार, तर उपपंतप्रधान ओलीस?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 6:32 AM

ब्रिटनच्या द स्पेक्टॅटर या नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार हैबतुल्ला अखुंदजादा आणि मुल्ला बरादर हे दोघे हिंसाचारात जखमी झाले आहेत. या संघर्षानंतर मुल्ला बरादरला ओलीस ठेवले असून, अखुंदजादा बहुधा मरण पावला आहे.

काबूल : अफगाणिस्तानातील सर्व प्रांत ताब्यात आल्यानंतर तालिबानी नेत्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी त्यांच्यात सत्तेसाठी प्रचंड संघर्ष सुरू असून, उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर यांना ओलीस ठेवले आहे आणि पंतप्रधान व सर्वोच्च तालिबानी नेता हैबतुल्ला अखुंदजादा सध्या बेपत्ता आहे. त्याला ठार मारण्यात आल्याचे वृत्त आहे.

ब्रिटनच्या द स्पेक्टॅटर या नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार हैबतुल्ला अखुंदजादा आणि मुल्ला बरादर हे दोघे हिंसाचारात जखमी झाले आहेत. या संघर्षानंतर मुल्ला बरादरला ओलीस ठेवले असून, अखुंदजादा बहुधा मरण पावला आहे. मुल्ला बरादर याच्याकडून वाचून घेतलेले निवेदन एका वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आले. ते त्याच्याकडून जबरदस्तीने वाचून घेण्यात आल्याचा दावा होतो आहे. बरादरकडेच अफगाणची सूत्रे यावी, अशी अमेरिकेची इच्छा होती, असे कळते. 

महिला मंत्रालय बरखास्ततालिबानने महिला मंत्रलयही बंद केले आहे. त्याऐवजी पुण्यप्रसार मंत्रलय स्थापन केले आहे. त्यामुळे संतप्त महिला मोर्चे काढत आहेत.

आयएसआयचा पाठिंबा- या संघर्षात हक्कानी नेटवर्कचा विजय झाल्याचे वृत्त आहे. या नेटवर्कला पाकच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेचा पाठिंबा आहे. - मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना या तालिबानी नेत्यांत प्रचंड वाद सुरू झाले. खुर्च्या, टेबल आणि गरम चहाचे थर्मास एकमेकांच्या अंगावर फेकण्यात आले. हक्कानी नेटवर्कच्या खलील उल रहमानी हक्कानीने केलेल्या मारहाणीत मुल्ला बरादर खूपच जखमी झाला. आयपीएलवर बंदी, क्रिकेट बोर्ड बरखास्त सध्या आयपीएलच्या सामन्यांत अफगाणिस्तानातातील रशिद खान, मोहमद नबी व मुजीब उर रहमान सहभागी आहेत. पण हे सामने इस्लामविरोधी असल्याचे सांगून, ते टीव्हीवर दाखवण्यास तालिबानने बंदी घातली आहे. अफगाण क्रिकेट बोर्डही बरखास्त करण्यात आले आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानTerrorismदहशतवादIslamइस्लामMuslimमुस्लीम