कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 18:24 IST2025-07-18T18:15:12+5:302025-07-18T18:24:51+5:30
कॅनडातील व्हँकुव्हर विमानतळावर एका लहान विमानाच्या अपहरणामुळे खळबळ उडाली. शाहीर कासिम नावाच्या व्यक्तीवर विमान अपहरण आणि दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला आहे.

कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
कॅनडामध्ये एका विमानाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. या विमानाच्या मदतीसाठी एफ-15 हे लढाऊ विमान पाठवण्यात आली. त्यानंतर, विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीर कासिम नावाच्या ३९ वर्षीय कॅनेडियन व्यक्तीवर विमान अपहरण आणि दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
ही घटना मंगळवारी घडली. उत्तर अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडने अपहरण केलेल्या विमानाच्या मागे एक F-15 लढाऊ विमान पाठवले, त्यानंतर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कासिमने व्हिक्टोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका फ्लाइट इन्स्ट्रक्टरला धमकी देऊन सेस्ना विमान ताब्यात घेतले आणि नंतर सुमारे ६४ किलोमीटर उड्डाण केल्यानंतर व्हँकूवरला पोहोचला. संशयिताने हवाई क्षेत्रात व्यत्यय आणण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.
स्वत:ला देवदूत समजू लागला...
माहितीनुसार, कासिमने व्हिक्टोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका उड्डाण प्रशिक्षकाला धमकावले आणि सेस्ना विमानाचा ताबा घेतला. त्यानंतर त्याने व्हँकूवरला पोहोचण्यासाठी सुमारे ६४ किलोमीटर अंतर कापले. कासिमने स्वतःला "अल्लाहचा संदेशवाहक" आणि "मसीहा" म्हटले.
त्याला हवामान बदलापासून मानवतेला वाचवण्यासाठी पाठवण्यात आले आहे, अशा दावा केला आहे. तो म्हणाला की, "देवदूत जिब्रिल" ने त्याला अल्लाहचा संदेश दिला. त्याने सोशल मीडियावर असेही लिहिले की जर जागतिक तापमानवाढ अशीच वाढत राहिली तर काही वर्षांत मानव नामशेष होऊ शकतात.