Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 08:09 IST2025-12-16T08:06:57+5:302025-12-16T08:09:17+5:30
Mexico Plane Crash: इमर्जन्सी लँडिंग करत असताना विमानाचा भयंकर अपघात झाला. जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट होऊ आगीचा भडका उडाला, ज्यात १० लोक मरण पावले आहेत.

Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
Mexico Plane Crash Video: इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असतानाच एक खासगी विमान कोसळले. सोमवारी (१५ डिसेंबर) मेक्सिको हा भीषण अपघात झाला. यात आठ प्रवासी आणि विमानातील दोन क्रू मेंबर्ससह दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
एपी वृत्तसंस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मेक्सिकोच्या राज्य संरक्षक समन्वयक एड्रियन हर्नांडेज यांनी या घटनेबद्दलची माहिती दिली आहे. मेक्सिको शहरापासून ५० किमी अंतरावर पश्चिमेला ही घटना घडली.
मेक्सिको शहराच्या पश्चिम दिशेला असलेल्या टोलुका विमानतळापासून ५ किमी अंतरावर सॅन मेटो एटेंको ही औद्योगिक वसाहत आहे, त्याच ठिकाण हे विमान कोसळले.
CCTV footage reportedly captures the moments leading up to the small plane crash near Toluca Airport, east of Mexico City this afternoon... pic.twitter.com/pBuyG5YrmK
— Volcaholic 🌋 (@volcaholic1) December 15, 2025
सात मृतदेह मिळाले
अपघातग्रस्त विमान अकापुल्को विमानतळावरून झेपावले होते. हर्नांडेज यांनी सांगितले की, हे खासगी विमान होते. आठ प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्सची नोंदणी झालेली होती. पण, अपघात झाल्यानंतर काही तासांनी घटनास्थळावर सात मृतदेहच मिळाले आहेत.
मैदानावर लँडिंगचा प्रयत्न
वैमानिक जवळ असलेल्या एका फुटबॉल मैदानावर इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न करत होता. पण, मैदानाला लागून असलेल्या एका कंपनीच्या कारखान्यावर जाऊन हे विमान धडकले. त्यानंतर विमान कोसळले आणि आगीचा भडका उडाला.
PLANE CRASH in Mexico
— RT (@RT_com) December 15, 2025
Thick smoke billows from the crash site of a small aircraft near Toluca Airport
Emergency services reportedly on the scene, casualties unknown pic.twitter.com/hixjcrvQkD
सॅन मेटो एटेंकोचे महापौर एना मुनीज यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, विमान कोसळल्यानंतर लागलेल्या आगीमुळे त्या ठिकाणावरून १३० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.