शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विमान दुर्घटना; १९८ मृतदेह रेल्वेने रवाना

By admin | Updated: July 21, 2014 02:04 IST

दुर्घटनाग्रस्त मलेशियन विमानाच्या ढिगाऱ्यांतून काढण्यात आलेले १९८ मृतदेह रशियासमर्थक युक्रेनियन बंडखोरांनी रविवारी एका वातानुकूलित रेल्वने हलविले

कीव : दुर्घटनाग्रस्त मलेशियन विमानाच्या ढिगाऱ्यांतून काढण्यात आलेले १९८ मृतदेह रशियासमर्थक युक्रेनियन बंडखोरांनी रविवारी एका वातानुकूलित रेल्वने हलविले. दरम्यान, बंडखोरांच्या ताब्यातील युक्रेनच्या या भागात अपघातस्थळापर्यंत विनाअडथळा पोहोचण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे.‘रिया नोवोस्ती’ या वृत्तसंस्थेनुसार, घटनास्थळावरून जवळपास १५ किलोमीटर अंतरावरील तोरेज भागातल्या एका स्टेशनवरून मृतदेह रेल्वेने हलविण्यात आले. रेल्वे बंडखोरांच्या नियंत्रणाखालील युक्रेनच्या डोनेत्सक शहराकडे रवाना झाली आहे. युरोपीय सुरक्षा आणि सहकार्य संघटनेचा (ओएससीई) प्रवक्ता मायकल बोसिऊरकीव यांनी सांगितले की, स्टेशनवर दुर्गंधी पसरली आहे. या मालगाडीच्या सुरक्षेसाठी तैनात बंडखोरांनी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ येईपर्यंत मृतदेह घेऊन न जाण्याचा संकल्प केला होता. तथापि, रेल्वे स्टेशनवरून रवाना झाली असून हिचा पहिला थांबा इलोवास्क येथे असेल. येथून रेल्वे राजधानी डोनेस्ककडे जाईल. ओएससीईच्या निरीक्षकांच्या मते, रेल्वेत १९८ मृतदेह आहेत. ओएससीईच्या निरीक्षकांना सशस्त्र बंडखोरांनी आज घटनास्थळी नेले. फ्रान्सचा इशारादरम्यान, युक्रेन मुद्यावर तात्काळ आवश्यक कारवाई न केल्यास युरोपीयन युनियनमध्ये परिणाम भोगावे लागतील, असा इशारा फ्रान्सने रशियाला दिला आहे. जागतिक नेत्यांकडून रशियावर बंडखोर आणि युक्रेन सरकार यांच्यात शस्त्रसंधीसाठी दबाव वाढत आहे. रशियाने दबाव वापरावाबर्लिन : पूर्व युक्रेनमध्ये शस्त्रसंधी करार घडवून आणण्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया समर्थक बंडखोरांवरील आपल्या प्रभावाचा वापर करावा, अशी मागणी जर्मन चॅन्सलेर अँजेला मर्केल यांनी केली आहे. पुतीन यांच्याशी त्यांनी शनिवारी दूरध्वनीवरून संवाद साधला. मलेशियन विमान अपघाताची आंतरराष्ट्रीय नागरी विमान संघटना अर्थात आयसीएओच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय चौकशी करण्यावर उभय नेत्यांमध्ये एकमत झाले. (वृत्तसंस्था)