Plane Collide: विमानांची भीषण टक्कर; दोन्ही वैमानिकांचा मृत्यू, पहा धक्कादायक Video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 17:28 IST2022-09-26T17:28:16+5:302022-09-26T17:28:39+5:30
Plane Accident: हवेत असताना दोन विमानांचा भीषण अपघात झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Plane Collide: विमानांची भीषण टक्कर; दोन्ही वैमानिकांचा मृत्यू, पहा धक्कादायक Video...
Plane Collide in Sky :विमानअपघाताच्या बातम्या सतत येत असतात. नुकतीच एका अमेरिकन विमानाला आग लागल्याची बातमी आली होती. आग लागल्यानंतर फ्रेंच विमान धावपट्टीवरून घसरले आणि तलावात कोसळले. यानंतर आता जर्मनीतून एक बातमी आली आहे, ज्यामध्ये दोन छोट्या विमानांची हवेत एकमेकांशी भीषण टक्कर होते.
प्रशिक्षणादरम्यान अपघात
ही घटना जर्मनीच्या लेमनिज एअरफील्डची आहे. 'द सन'च्या वृत्तानुसार, दोन्ही विमानांचे पायलट एका विशिष्ट पॅटर्नसाठी प्रशिक्षण घेत असताना हा अपघात झाला. दोन्ही वैमानिक 'मिरर फ्लाइट'चे प्रशिक्षण घेत होते. यादरम्यान दोन्ही विमाने एकमेकांना समांतर उड्डाण करत होती. यावेळी अचानक दोन्ही विमाने एकमेकांवर आदळली, यात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला.
@mdr_th Flugzeugabsturz in Gera bei Kunstflug. Einfach furchtbar! pic.twitter.com/iE4k4Kr0o0
— Die Hoffnung stirbt zuletzt (@green_grap) September 24, 2022
या दोन्ही विमानांची टक्कर होताच अचानक आग लागली आणि दोन्ही विमाने जमिनीवर कोसळली. विमानाचा अपघात झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या अपघातानंतर तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. मात्र अपघातात वैमानिकांचा जीव वाचू शकला नाही. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटेचा एक धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे.