धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:54 IST2025-11-18T12:41:01+5:302025-11-18T12:54:08+5:30
एका विमान अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये धावपट्टीवर जळणारे विमान काँगोचे असल्याचे सांगितले जात आहे.

धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
काँगोच्या एका विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये धावपट्टीवर उतरताना एका विमानाला आग लागल्याचे दिसत आहे. याच विमान विमानात काँगो सरकारच्या मंत्री प्रवास करत होते.
ही घटना घडली तेव्हा देशाचे खाण मंत्री लुईस वाटुम काबांबा आणि उच्च अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ विमानात होते. आग लागलेले विमान एरोजेट अंगोला द्वारे चालवले जाणारे एम्ब्रेअर ERJ-145LR होते.
सोमवारी किन्शासाहून लुआलाबा प्रांतातील कोल्वेझीला जाणारे विमान कोल्वेझीच्या धावपट्टी २९ वर उतरताना त्याच्या मागील भागात आग लागली. या घटनेचे भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
खिडक्यांमधून लोकांनी उड्या टाकल्या
व्हिडिओमध्ये विमानाला भीषण आग लागल्याची दिसत आहे. यावेळी विमानतळावर आघ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये विमानातील घाबरलेले प्रवासी बाहेर पडण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. काही जण घाबरून पडले तर काही जण खिडक्यांमधून बाहेर पळताना दिसत आहेत.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही
मंत्र्यांचे संपर्क सल्लागार आयझॅक न्येम्बो यांनी याबाबत पुष्टी केली आहे. लुआलाबा प्रांतातील कोल्वेझी विमानतळावर उतरताना विमान धावपट्टीवरून घसरले होते. या अपघातात कोणताही प्रवासी किंवा क्रू मेंबरचा मृत्यू झाला नाही. संपूर्ण जेट आगीत जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. सध्या अपघाताचे कारण तपासकर्ते तपासत आहेत. मंत्री कोल्वेझीजवळील कालोंडो खाणीत प्रवास करत होते, तिथे १५ नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसामुळे पूल कोसळल्याने अनेक कामगारांचा मृत्यू झाला होता.
विमान धावपट्टीवरून घसरले
विमान किन्शासा-एन'डजिली येथून निघाले आणि कोल्वेझी विमानतळावर उतरले. रनवे २९ वर उतरताना, विमान धावपट्टीवरून घसरले, यामुळे त्याचा मुख्य गियर तुटला. यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले आणि त्याच्या मागील बाजूला आग लागली. आतील प्रवाशांना लगेच बाहेर काढण्यात आले. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
An Embraer ERJ-145 crashed landing at Kolwezi Airport, Democratic Republic of the Congo, veered off runway and caught fire.
— GeoTechWar (@geotechwar) November 17, 2025
The plane was destroyed, but all onboard, including the Mines Minister, evacuated safely. No injuries reported. Investigation ongoing into the crash. #DRChttps://t.co/PxHq56C6Z9pic.twitter.com/4rg5NDV2wb