शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 08:46 IST

कॅलिफोर्नियामध्ये इमिग्रेशन विभागाच्या कारवाईविरुद्ध लोक आंदोलन करत असताना ट्रम्प प्रशासनाने शहरामध्ये नॅशनल गार्ड तैनात केले होते.

Los Angeles Protests: बेकायदा स्थलांतरितांवर केलेल्या कारवाईनंतर झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान लॉस एंजेलिसमध्ये मोठ्या संख्येने लोकांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ट्रम्प यांच्या हद्दपारी धोरणाचा एक भाग आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘नॅशनल गार्ड’च्या सैनिकांची कुमक तैनात केली होती. मात्र त्यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र झालं आणि हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. मात्र आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी नॅशनल गार्डच्या मदतीसाठी सुमारे ७०० ड्युटी मरीन कमांडो पाठवले आहेत. त्यामुळे आता कॅलिफोर्नियात तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर सुरु करण्यात आलेल्या इमिग्रेशन मोहिमेविरोधात लॉस एंजेलिसमध्ये गेल्या चार दिवसांपासून आंदोलन भडकले आहे. बेकायदा स्थलांतरितांच्या घरावर छापे टाकल्यानंतर तिथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरु आहे. मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅलिफोर्निया नॅशनल गार्डच्या सैनिकांना परिस्थिती हाताळण्यासाठी तैनात केले होते. मात्र परिस्थिती त्यानंतरही आणखी चिघळली. आता ट्रम्प यांनी नॅशनल गार्डच्या मदतीसाठी ७०० लॉस एंजेलिस शहरात ७०० मरीन कमांडो तैनात केले आहेत.

कागदपत्रे नसलेल्या बेकायदा स्थलांतरितांवर छापे टाकण्यात आले होते. त्यानुसार इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी छापे टाकूनशंभरहून अधिक जणांना अटक केली. मात्र यानंतरच संघर्षाची ठिणगी पडली. या इमिग्रेशन मोहिमेविरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली. यामध्ये प्रामुख्याने अमेरिकन इमिग्रेशन अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून ट्रम्प प्रशासनाने गव्हर्नरच्या संमतीशिवाय नॅशनल गार्ड तैनात केले. त्यामुळे आंदोलनाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी शहरात २,१०० नॅशनल गार्ड सैनिकांसह ७०० मरीन कमांडो तैनात केले आहेत. 

दरम्यान, आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी नॅशनल गार्डच्या सैनिकांनी अश्रुधुराचा वापर, स्फोटके आणि रबरी गोळ्यांचा वापर केला. प्रत्युत्तर देताना, आंदोलकांनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या वाहनांवर दगडफेक केली आणि कचरा जाळून रस्ते अडवले. शुक्रवारी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी केलेल्या छाप्यांपासून परिसरात तणाव वाढला आहे. या छाप्यांमध्ये लॉस एंजेलिसच्या फॅशन डिस्ट्रिक्ट आणि होम डेपोमध्येही छापे टाकण्यात आले. एका आठवड्यात शहरात अटक केलेल्या स्थलांतरितांची संख्या १०० पेक्षा जास्त आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पCaliforniaकॅलिफोर्नियाAmericaअमेरिका