शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
3
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
4
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
5
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
6
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
7
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
8
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
9
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
10
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
11
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
12
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
13
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
14
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
15
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
16
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
17
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
18
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
19
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
20
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
Daily Top 2Weekly Top 5

आशिया खंडातील या चार देशांना लॉकडाऊन हटवणे पडले महागात, तर पुन्हा एकदा कोरोनाने घातले थैमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 12:13 IST

योग्य काळजी घेतली तर कोरोनाची लागण होणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या देशात लॉकडाऊन हटवण्यात आले.

कोरोनाचा संसगर्ग टाळण्यासाठी अख्या जगासमोर लॉकडाऊन हाच एक पर्याय होता. संक्रमण रोखण्यासाठी जगात परिस्थितीनुसार लॉकडाऊन लावण्यात आले. असंख्य लोक घरात बंदिस्त झाले. मात्र किती दिवस असे घरात बसणार? त्यामुळे कोरोनाला न घाबरता त्याच्यासह जगण्याची सवय लावावीच लागणार आणि म्हणून विविध उपायांनुसार खबरादारी पाळण्यात आली. योग्य काळजी घेतली तर कोरोनाची लागण होणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या देशात लॉकडाऊन हटवण्यात आले. मात्र अतिघाई संकटात नेई असाच काहीसे आशिया खंडातील या देशांमध्ये घडले. परिणामी कोरोना आटोक्यात आणता आणता रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांना पुन्हा एकदा कोरोनाने धडकी भरवली आहे.

इंडोनेशिया

मेच्या सुरुवातीपर्यंत इंडोनेशियाने कोरोनावर नियंत्रण मिळवले होते, मात्र मे महिना संपता संपता दुर्गम बेट मालुकूपर्यंत कोरोना पाेहोचला. येथील लोकांची ये-जा जावा आणि बालीसारख्या भागातही आहे. यामुळे तेथेही धोका वाढला आहे. मेच्या पहिल्या आठवड्यात देशात १२ हजार बाधित होते, जे गुरुवारी वाढून २४५३८ झाले.

श्रीलंका
 
५२ दिवसांच्या लॉकडाऊननंतर श्रीलंकामध्येही पुन्हा जनजीवन सुरू झाले. ११ मेपासून तेथील बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या. मात्र  कुवेतहून परतलेले २५० जण पॉझिटिव्ह आढळल्याने रविवारपासून लॉकडाऊनचे काही नियम पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

फिलिपिन्स

फिलिपिन्समध्ये लॉकडाऊनचे नियम सर्वात कडक होते. संक्रमण रोखण्यासाठी घरातच बसा असे वारंवार नागिरकांना सांगून देखील विनाकारण बाहेर पडत होते. देशात एवढे कडक वातावरण होते की, राष्ट्रपती दुतेर्ते यांनी सांगितले होते, एखाद्याने लॉकडाऊन तोडल्यास त्याला गोळी घाला.  शेवटी किती दिवस लॉकडाऊन वाढवणार, लॉकडाऊन वाढवणे म्हणजे आर्थिक परिस्थिती धोक्यात घालण्यासारखे होते म्हणून ११ मे रोजी मनिला विमानतळ आणि १६ मे रोजी मेट्रो व काही मॉल उघडण्यात आले. शुक्रवारपासून अंतर्गत उड्डाणे सुरू करण्यात आली. यामुळे देशभरात रुग्ण वाढू लागले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या