गाझात Parle-G चा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 20:09 IST2025-06-06T20:06:50+5:302025-06-06T20:09:10+5:30

Parle-G Biscuit Sold for 2350: इस्रायलने गाझामध्ये युद्ध बंदी केल्यानंतर गाझावासिय आनंदित झाले होते. परंतू, त्यांच्या आनंदावर लगेचच विरजण पडले. इस्रायलने मदतीचे सर्व मार्ग बंद केल्याने ही परिस्थिती उद्भवली

Parle-G's Rs 60 biscuits sold for Rs 2350 in Gaza; father brought it to his daughter viral video of war zone | गाझात Parle-G चा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...

गाझात Parle-G चा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...

युद्ध अनेक पिढ्यांचे आयुष्य बरबाद करते, आजवर हजारो युद्ध लढली गेली असतील. पूर्वीच्याकाळी राजा त्यांचे राज्य वाढविण्यासाठी-टिकविण्यासाठी लढायचे, आता देश दहशतवादाविरोधात लढत आहेत. या सर्वच युद्धांनी लोकांची आयुष्य उध्वस्त केली आहेत. युद्धाच्या यातना सध्या गाझा, युक्रेनचे लोक भोगत आहेत. गाझामधून काळीज हेलावून टाकेल असा बाप-मुलीचा व्हिडीओ येत आहे. 

इस्रायलने गाझामध्ये युद्ध बंदी केल्यानंतर गाझावासिय आनंदित झाले होते. परंतू, त्यांच्या आनंदावर लगेचच विरजण पडले. हमासविरोधात पुन्हा कारवाई सुरु झाली आणि इस्रायलने गाझाचे सर्वच मार्ग बंद केले. शस्त्रपुरवठा नाही, अन्न धान्याचाही पुरवठा या भागात न होऊ देण्याचा निर्णय घेतला गेला. यामुळे या भागात प्रचंड भूकबळी जाऊ लागले आहेत. अन्न धान्याचा तुटवडा असल्याने लोकांचे खायचे-प्यायचे वांदे झाले आहेत. इस्रायलने मदतीचे सर्व मार्ग बंद केल्याने ही परिस्थिती उद्भवली असली तरी तिथे जे मिळतेय ते दामदुप्पट नाही तर कित्येक पटींनी जास्त पैसे मोजून घ्यावे लागत आहे. 

गाझामधून जो व्हिडीओ येत आहे, तो पारले जी बिस्किट पुड्याचा आहे. भारतात हा पुडा पाच रुपयांना, परदेशात १०० रुपयांना वगैरे मिळतो. अशा १२ पुड्यांचे पॅकेट गाझामध्ये २३५० रुपयांना घ्यावा लागत आहे. मोहम्मद जवाद या गाझामध्ये राहणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुलीला आवडतो म्हणून तिच्या आनंदासाठी आपण ५-५ रुपयांच्या पारलेजीचे भारतात 60 रुपयांना मिळणारे पाकीट २३५० रुपयांना आणले असल्याचे म्हटले आहे. त्याची ती गोंडस मुलगी ते पॅकेट खोलून घेऊन पारले जी बिस्कीट खात आहे. 

या बिस्कीट पुड्याची किंमत जी आधी १.५ युरोला होती ती आता २४ युरो झाली असल्याचे त्याने यात म्हटले आहे. यासाठी देखील मुलीला खूप दिवस वाट पहावी लागल्याचे त्याने म्हटले आहे. 

Web Title: Parle-G's Rs 60 biscuits sold for Rs 2350 in Gaza; father brought it to his daughter viral video of war zone