इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:47 IST2025-06-19T15:45:49+5:302025-06-19T15:47:14+5:30
...अशा एकूण परिस्थितीत पाकिस्तानला एक वेगळीच भीती वाटू लागली आहे. इराणनंतर, पुढचा नंबर पाकिस्तानचा लागू शकतो, असे पाकिस्तानातील लोकांना वाटू लागले आहे.

इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेले इस्रायल-इराण युद्ध सहाव्या दिवशीही सुरूच आहे. इस्रायलनेइराणची राजधानी असलेल्या तेहरानवर जबरदस्त बॉम्बिंग केली आहे. याचवेळी, इराणने इस्रायलच्या तेल अवीव आणि इतर शहरांवर क्षेपणास्त्र डागली. दरम्यान, अमेरिका लवकरच या युद्धात भाग घेऊ शकते, असे वृत्त आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याला बिनशर्त शरणागतीची धमकी दिली आहे. इराणला अणुबॉम्ब मिळवू देणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अशा एकूण परिस्थितीत पाकिस्तानला एक वेगळीच भीती वाटू लागली आहे. इराणनंतर, पुढचा नंबर पाकिस्तानचा लागू शकतो, असे पाकिस्तानातील लोकांना वाटू लागले आहे.
पाकिस्तानसाठी धोका वाढला -
पाकिस्तानी पत्रकार सईद काझी एका कार्यक्रमात म्हणाले, "अमेरिका इराणमध्ये बंकर बस्टर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इराणचा अणुकार्यक्रम संपवल्यानंतर इस्रायल थांबेल, अशा भ्रमात पाकिस्तानने कदापी राहू नये. पाकिस्तानने आतापासूनच याला विरोध करायला हवा की, इराणमध्ये बंकर बस्टर बॉम्बचा वापर केल्यास आपण गप्प बसणार नाही." याशिवाय, इस्रायलचा इराणवरील हल्ला पाकिस्तानसाठी धोकादायक आहे. तसेच हे युद्ध जिंकल्यानंतर, इस्रायल थेट पाकिस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचेल, असे सईद काझी यांनी म्हटले आहे.
ब्रिगेडियर हरिस नवाज (निवृत्त) यांनी आरोप केला आहे की, इस्रायलच्या इराणमधील यशात भारतीय गुप्तचर संस्था रॉचा मोठा हात आहे. चाबहारमध्ये बसून रॉने इस्रायली गुप्तचर संस्था मोसादला इराणमध्ये लिंक केले आणि तिला मोठा एक्सेस दिला. यानंतर, आता मोसाद इराणमध्ये आपल्या मानाप्रमाणे कारवाया चालवत आहे आणि वरिष्ठ कमांडर्सना संपवत आहे.
एक चूक इराणला पडू शकते भारी -
माजी पाकिस्तानी लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हरिस नवाज यांनी त्याच कार्यक्रमात म्हटले आहे की, इराणसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, त्याने अमेरिका अथवा इतर कोणत्याही पाश्चात्य देशाच्या तळांवर हल्ला करू नये. जर इराणने असे केले, तर ती एक मोठी चूक असेल, कारण इस्रायलला हेच हवे आहे. तेहरानने असे करताच अमेरिका या युद्धात उडी घेईल आणि नंतर इस्रायल-अमेरिका दोघे मिळून इराणमध्ये हाहाकार माजवतील.