इराण युद्धाचा पाकिस्तानला पहिला फटका! ३ दिवसांपासून इंधन पुरवठा बंद; पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:01 IST2026-03-06T10:54:00+5:302026-03-06T11:01:17+5:30

अमेरिका इराण युद्धामुळे जगात तेलाचा तुटवडा पडला आहे. पाकिस्तानमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलचा फक्त तीन दिवसांचा साठा शिल्लक राहिल्याची माहिती समोर आली आहे.

Pakistan's first blow from Iran war! Fuel supply stopped for 3 days; Long queues at petrol pumps | इराण युद्धाचा पाकिस्तानला पहिला फटका! ३ दिवसांपासून इंधन पुरवठा बंद; पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा

इराण युद्धाचा पाकिस्तानला पहिला फटका! ३ दिवसांपासून इंधन पुरवठा बंद; पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा

मागील सहा दिवसांपासून  अमेरिका इस्त्रालय इराण यांच्यात तणाव सुरू आहे. दोन्ही देशांनी इराणवर मोठे हल्ले केले. या हल्ल्यात इराणचे प्रमुख नेते खामेनेई यांच्या मृत्यू झाला. यामुळे चवळताळलेल्या इराणने सात देशांवर हल्ले केले, यासह हार्मुझ मार्ग बंद केला आहे. यामुळे आता समुद्री मार्गे होणारी आयात-निर्मात ठप्प आहे. याचा परिणाम जगभरातील अनेक देशांवर झाला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे आधीच अफगाणिस्तानसोबत तणाव सुरू आहे. दरम्यान, पाकिस्तानमधीलपेट्रोल आणि डिझेलचा साठा झपाट्याने कमी होत आहे. 

देशात फक्त काही दिवसांचे तेल शिल्लक राहण्याची भीती आहे. पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन आता म्हणते की सरकार २०-२५ दिवसांचा पुरवठा असल्याचा दावा करत असले तरी, गेल्या तीन दिवसांपासून त्यांना काहीही मिळालेले नाही. 

US Israel Iran War : इराणने घेतला मोठा बदला! अमेरिकेच्या 'वॉर्निंग सिस्टीम'चे केले नुकसान; सॅटेलाईट फोटो आले समोर

पीपीडीए नेत्यांनी गुरुवारी एक इशारा जारी केला, यामध्ये पेट्रोलियम कंपन्यांनी पुरवठा कमी केल्याचा आरोप केला. जर पुरवठा सुधारला नाही तर पुढील काही दिवसांत पेट्रोल पंप बंद होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. सर्व ओएमसी त्यांना त्रास देत आहेत, असा दावाही केला आहे. त्यांच्या मागण्या ५० टक्के कमी करण्यात आल्या आहेत आणि तेही २-३ दिवसांनी. या आठवड्याच्या शेवटी, पाकिस्तानचा तेल पुरवठा जवळजवळ संपेल.

इंधनाच्या कमतरतेमुळे किमती वाढतात

असोसिएशनचे केंद्रीय सरचिटणीस चौधरी इरफान इलाही म्हणाले की, इंधन पुरवठ्यातील कमतरतेमुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. डिझेलचा पुरवठा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, तो फक्त २०% पर्यंत घसरला आहे. पेट्रोलचा पुरवठा देखील लक्षणीयरीत्या कमी झाला आहे." तेलाच्या पुरवठ्याअभावी इंधनाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत, डिझेलच्या किमती १७ पाकिस्तानी रुपयांनी आणि पेट्रोलच्या किमती ३५ पाकिस्तानी रुपयांनी वाढल्या आहेत, असा इलाही यांनी दावाही केला.

दरम्यान, मध्य पंजाबचे अध्यक्ष नौमान मजीद म्हणाले की, पेट्रोलचा पुरवठाही ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. काही खाजगी कंपन्यांनी या कमतरतेमुळे पेट्रोलियम पदार्थांची साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप त्यांनी केला. पेट्रोल पंप चालक सरकारला त्यांच्या पंपांना पुरेसा इंधन पुरवठा करण्याचे आवाहन करत आहेत. पुरवठा डेपोऐवजी पेट्रोल स्टेशनवर सरकारी तपासणी केली जात असल्याने ऑपरेटर नाराज आहेत. 

Web Title : ईरान युद्ध का पहला असर: पाकिस्तान में ईंधन संकट, पंप सूखे

Web Summary : ईरान संघर्ष से ईंधन आयात रुका, पाकिस्तान प्रभावित। कमी से तनाव बढ़ा, पंप बंद। घटती आपूर्ति के बीच कीमतें बढ़ीं; नागरिकों को और कमी का डर।

Web Title : Iran War's First Impact: Pakistan Faces Fuel Crisis, Pumps Run Dry

Web Summary : Iran's conflict halts fuel imports, hitting Pakistan hard. Shortages worsen existing tensions, sparking pump closures. Prices surge amid dwindling supplies; citizens fear further scarcity.