Pok बाबत पाकिस्तानचा मोठा निर्णय; राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 02:58 PM2020-05-18T14:58:46+5:302020-05-18T14:59:18+5:30

जम्मू काश्मीरसह गिलगिट बाल्टिस्तान आणि लडाख हे भारताचे अधिकृत क्षेत्र आहे. पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानवर अनधिकृतरित्या ताबा घेतलेला आहे.

Pakistan's big decision regarding Pok; Election Approved by President Arif Alvi hrb | Pok बाबत पाकिस्तानचा मोठा निर्णय; राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी दिली मंजुरी

Pok बाबत पाकिस्तानचा मोठा निर्णय; राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी दिली मंजुरी

Next

इस्लामाबाद : पाकिस्तान कोरोनाच्या संकटात पुरता कोलमडलेला असतानाही भारताविरोधातील खुमखुमी काही कमी होत नाहीय. भारतानेपीओकेमधील गिलगिट बाल्टिस्तानमधील सरकारी हस्तक्षेपावर आक्षेप घेतलेला असतानाही निवडणूक घेण्यासाठी आणि काळजीवाहू सरकार बनविण्यासाठी पाकिस्तानने मोठे पाऊल उचलले आहे. 


गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानच्या न्यायपालिकेला त्यावर निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाहीय. या भागाला पाकिस्तानने रिकामे करावे, अशा शद्बांत भारताने पाकिस्तानला ३० एप्रिलला सुनावले होते. मात्र, याकडे पाकिस्तानने दुर्लक्ष केले असून आज पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी निवडणूक घेण्यासाठी आणि काळजीवाहू सरकार बनविण्यासाठी मंजुरी दिली आहे. 


जम्मू काश्मीरसह गिलगिट बाल्टिस्तान आणि लडाख हे भारताचे अधिकृत क्षेत्र आहे. पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानवर अनधिकृतरित्या ताबा घेतलेला आहे. यामुळे त्यांना न्यायपालिकेद्वारे निर्णय घ्यायचा अधिकार नाही. अशा शब्दांत पाकिस्तानला सुनावले होते. तसेच भारतीय हवामान विभागाने जम्‍मू-काश्‍मीरच्या सब डिव्हीजनला आता  जम्‍मू आणि कश्‍मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबाद म्हणण्यास सुरुवात केली होती. यावरूनही पाकिस्तान तोंडघशी पडला होता. 


शनिवारी पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट, बाल्टिस्तानबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, या भागात पारदर्शक निवडणुका करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी गिलगिट बाल्टिस्तान आणि काळजीवाहू अधिनियम, २०२० ला मंजुरी दिली आहे. 
या अधिसुचनेमध्ये असे म्हटले आहे की, गिलगिट, बाल्टिस्तानमध्ये काळजीवाहू सरकार बनविणे गरजेचे बनले आहे. यामुळे या आदेशाद्वारे तेथील काळजीवाहू सरकारला दोन महिन्यांत विधानसभा निवडणुका घेणे बंधनकारक आहे. काही अडचणी आल्यास तेथील काळजीवाहू सरकारचा कार्य़काळही वाढविला जाऊ शकतो. 


या भागावर चीनचाही डोळा आहे. पाकिस्तानन चीनच्या एका कंपनीसोबत ४४२ अब्ज रुपयांच्या एका कंत्राटावर सही केली आहे. यामुळे पाकिस्तानला मोठी गंगाजळी उपलब्ध होणार आहे. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये एक मोठे धरण बांधले जाणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या....

LockDown 4.0 : आज जे घडणार आहे, आपला देश कधीही विसरणार नाही

Lockdown: अज्ञात व्यक्ती देवदूत बनून आला; चार गरजूंचे लाखोंचे कर्ज फेडले

पीओकेवरून तणाव; पाकिस्तानची एफ १६, मिराज लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली

पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा

 

 

Web Title: Pakistan's big decision regarding Pok; Election Approved by President Arif Alvi hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app