शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

भारतीय समजून पाकिस्तानी जनतेने आपल्याच वैमानिकाला ठार मारले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 3:26 PM

विंग कमांडर अभिनंदन यांनी पाडलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 विमानातील वैमानिकाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानी लढाऊ विमानांचा हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे सुखरूप मायदेशी परतले आहेत. मात्र अभिनंदन यांनी पाडलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 विमानातील वैमानिकाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एफ-16 विमान मिग-21 ने केलेल्या हल्ल्यात पाडले गेल्यानंतर या विमानातील वैमानिकाने पॅराशूटच्या बाहेर उडी घेतली होती. मात्र पाकिस्तानच्या हद्दीत सुखरूपरीत्या उतरलेल्या या वैमानिकाला पाकिस्तानी नागरिकांना भारतीय वैमानिक समजून जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. विंग कमांडर शहजाजुद्दीन असे या दुर्दैवी वैमानिकाचे नाव आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाने बुधवारी भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी भारतीय हवाई दलासोबत उडालेल्या चकमकीत भारताच्या मिग 21 विमानाने पाकिस्तानच्या एका एफ-16 विमानाची शिकार केली होती. तर भारताचे हे मिग 21 विमानही कोसळले होते. त्यादरम्यान, मिग-21 मधील वैमानिक अभिनंदन वर्धमान पाकिस्ताच्या तावडीत सापडले होते. तर एफ-16 विमानातील वैमानिक शहजाजुद्दीन हे यशस्वीरीत्या पाकिस्तानच्या हद्दीत उतरले. मात्र शहजाजुद्दीन हे भारतीय वैमानिक असावेत, अशी समजूत करून घेत पाकिस्तानी नागरिकांनी त्यांना जबर मारहाण केली. मात्र तो भारतीय नाहीत तर पाकिस्तानी वैमानिक आहे हे समजले तोपर्यंत फार उशीर झाला होता. मात्र या प्रकाराला पाकिस्तानने अद्याप दुजोरा दिलेला नाही. भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलांमध्ये उडालेल्या हवाई चकमकीनंतर आपण भारताची दोन विमाने पाडल्याचा तसेच दोन वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला होता. मात्र हा खोटा दावाच पाकिस्तानी वैमानिकाच्या जीवावर बेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मृत पाकिस्तानी वैमानिकाच्या कुटुंबीयांच्या लंडनस्थित निकटवर्तीयाने यासंदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान