शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

भारतापेक्षा पाकिस्तानी नागरिक अधिक आनंदी; फिनलँड अव्वल, भारत १२६ व्या स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 06:55 IST

भारत आनंदी देशांमध्ये १४३ देशांच्या यादीत १२६ व्या स्थानावर असून, त्या तुलनेत पाकिस्तान मात्र १०८ व्या स्थानावर आहे.

नवी दिल्ली : दहशतवादी हल्ले आणि आर्थिक डोलारा ढासळलेला पाकिस्तान हा भारतापेक्षा अधिक आनंदी देश असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आले आहे. भारत आनंदी देशांमध्ये १४३ देशांच्या यादीत १२६ व्या स्थानावर असून, त्या तुलनेत पाकिस्तान मात्र १०८ व्या स्थानावर आहे.

आनंदी असण्याचे निकष काय?हा अहवाल तयार करण्यासाठी ६ पॅरामीटर्सवर आधारित प्रश्नावली तयार करण्यात आली होती. यामध्ये देशातील प्रत्येकाचे उत्पन्न, सामाजिक स्थिती, औदार्य, भ्रष्टाचार, सामाजिक स्वातंत्र्य, आरोग्य यांच्या आधारे आनंदी देश कोणता याचे स्थान ठरविण्यात आले. यात हजारो नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले होते.

सर्वात आनंदी देश कोणता? फिनलंडने सलग सातव्यांदा जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. येथे केवळ ५५ लाख लोकसंख्या आहे.त्याचवेळी अफगाणिस्तान या यादीत शेवटच्या स्थानावर राहिला. अहवालानुसार सर्वाधिक आनंदी देश युरोपियन आहेत.

भारताच्या आजूबाजूला काय? आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान १२६ वे असून, त्यानंतर १२७ व्या स्थानावर इजिप्त आहे. तर १२८ व्या स्थानावर श्रीलंका आहे. १२९ व्या स्थानावर बांगलादेश आहे. १३०व्या स्थानावर इथोपिया आहे. १३१ स्थानावर टांझानिया हा देश आहे.भारताच्या वर १२५ स्थानी जॉर्डन, १२४ व्या स्थानी टोगो, १२३ व्या स्थानी मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप-देश आहे. त्यावर माली, लिबिया, घाना, उगांडा, केनिया, युक्रेन सारखे देश आहेत. या यादीत चीन ६०व्या, नेपाळ ९३व्या म्यॅनमार ११८ स्थानावर आहे.

बड्या देशांचे स्थान घसरले१० वर्षांत प्रथमच अमेरिका आणि जर्मनी प्रमुख आनंदी देशांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. ते २३ व्या आणि २४ व्या स्थानावर पोहोचले आहेत. अमेरिकेचे स्थान गेल्या वर्षी १६ वे होते. या वर्षी कॅनडा यादीत १५ व्या स्थानावर आहे. 

भारतात वृद्ध खूश का आहेत? भारतात साठी पार केलेले नागरिक तरुणांच्या तुलनेत अधिक खूश आहेत. यातही भारतीय वृद्ध पुरुष महिलांच्या तुलनेत अधिक आनंदी आहेत. संपूर्ण जगातच प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत आनंदी महिला कमी आहेत. भारतात शिक्षण आणि जातव्यवस्था आनंदी राहण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.  जे लोक कमी शिकलेले आहेत आणि अनूसूचित जाती, जमातीचे आहेत, त्यांच्यामध्ये आनंदी असण्याचे प्रमाण कमी आहे.

सर्वांत आनंदी देश कोणते? रँक        देश१        फिनलँड२        डेन्मार्क३        आईसलँड ४        स्वीडन ५        इस्रायल६        नेदरलँड ७        नॉर्वे८        लक्झेंबर्ग ९        स्वित्झर्लंड१०        ऑस्ट्रेलिया

सर्वात दु:खी देश कोणते? रँक        देश१४३        अफगाणिस्तान १४२        लेबनान१४१        लेसोथो १४०        सियेरा लिओन १३९        काँगो १३८        झिम्बाब्वे१३७        बोत्स्वाना १३६        मलावी

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतPakistanपाकिस्तान