पाकिस्तानी हवाई दलाचे अफगाणिस्तानातील अनेक शहरांवर एअर स्ट्राइक, कंधारमधील तेल डेपोवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 09:14 IST2026-03-13T09:13:30+5:302026-03-13T09:14:26+5:30

Pakistan Attacks on Afghanistan: पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानातील अनेक शहरांवर हवाई हल्ले केल्याचा दावा करण्यात आला आहे. यात अनेक महिला आणि मुलांचा मृत्यू झाल्याचे अफगाणिस्तानने म्हटले आहे. 

Pakistani Air Force carries out airstrikes on several cities in Afghanistan, attacks oil depot in Kandahar | पाकिस्तानी हवाई दलाचे अफगाणिस्तानातील अनेक शहरांवर एअर स्ट्राइक, कंधारमधील तेल डेपोवर हल्ला

पाकिस्तानी हवाई दलाचे अफगाणिस्तानातील अनेक शहरांवर एअर स्ट्राइक, कंधारमधील तेल डेपोवर हल्ला

इराण-इस्रायल युद्ध पेटलेले असतानाच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला आहे आहे. अफगाणिस्तानने दावा केला आहे की, पाकिस्तानाने पुन्हा एकदा अफगाणच्या सार्वभौमत्वावर हल्ला केला आहे. काबूल, कंधार, पक्तिया आणि पक्तिकासह देशातील अनेक शहरांवर पाकिस्तानकडून हवाई हल्ले केले गेले आहेत. 

पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी कंधार विमानतळाजवळ असलेल्या खासगी विमान कंपनी काम एअर च्या तेल डेपोवर हल्ला केला. ही कंपनी देशातील विमानांबरोबरच संयुक्त राष्ट्र संघाच्या विमानांनाही तेल पुरवठा करते. इराण-इस्रायल संघर्षामुळे तेल संकट गडद होत असतानाच हा हल्ला केला गेला आहे. 

तालिबान सरकारमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरी वस्त्यांना लक्ष्य करून हे हवाई हल्ले केले गेले. यात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांचे मृत्यू झाले आहेत. पाकिस्तानच्या हवाई दलाने वाळवंटात आणि निर्जन ठिकाणीही बॉम्ब वर्षाव केला आहे. 

पाकिस्तानला याचे उत्तर दिले जाईल

रमजानच्या पवित्र महिन्यात पाकिस्तानकडून हे हल्ले केले गेले असून, क्रूर कारवाई असल्याचे अफगाणिस्तानने म्हटले आहे. रमजानचे शेवटचे १० दिवस शिल्लक असतानाच केल्या गेलेल्या या हल्ल्यांतून हेच दिसते की पाकिस्तानी सरकारला कोणतीही मानवी मूल्ये किंवा नैतिकता राहिलेली नाही, असे अफगाणिस्तानने म्हटले आहे. 

आम्ही या हल्ल्यांचा निषेध करतो आणि पाकिस्तानच्या या क्रू हल्ल्यांना उत्तर दिले जाईल. जोपर्यंत प्रत्युत्तर देत नाही, तोपर्यंत शांत राहणार नाही, असे तालिबान सरकारच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. 

Web Title : पाकिस्तान का अफगानिस्तान पर हवाई हमला, कंधार तेल डिपो तबाह

Web Summary : पाकिस्तान ने अफगानिस्तान के कई शहरों पर हवाई हमले किए, जिसमें कंधार में तेल डिपो नष्ट हो गया। अफगानिस्तान ने हमलों की निंदा की और जवाबी कार्रवाई की कसम खाई।

Web Title : Pakistan Air Strikes in Afghanistan: Kandahar Oil Depot Hit

Web Summary : Pakistan's air force struck multiple Afghan cities, including Kandahar, hitting an oil depot. Afghanistan condemns the attacks, especially during Ramadan, and vows retaliation for civilian casualties.