शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये जमिनीच्या तुकड्यासाठी दोन आदिवासी समुदाय भिडले, 49 लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 14:45 IST

Pakistan Violence : जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

Pakistan Violence : भारताचा शेजारील देश पाकिस्तान सध्या दंगलीच्या आगीत होरपळत आहे. जमिनीच्या एका छोट्या तुकड्यासाठी दोन आदिवासी समुदायांमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. खैबर पख्तूनख्वा भागात झालेल्या दंगलीत आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू, तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. या दंगलीत क्षेपणास्त्रे, मोर्टार, रॉकेट आणि स्वयंचलित तोफाही वापरल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, पाच दिवसांपूर्वी जमिनीच्या वादावरुन दोन समुदयांमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीचे रुपांतर दंगलीत झाले अन् पेवार, टांगी, बालिशखेल, खार काले, मकबाल, कुंज अलीझाई, पारा चमकनी आणि करमनसह अनेक भागात ही दंगल पसरली. या दरम्यान, दोन्ही बाजूने एकमेकांवर क्षेपणास्त्रे, मोर्टार, रॉकेट लॉन्चरसह अनेक शस्त्रांचा मारा करण्यात आला. 24 जुलैपासून सुरू झालेल्या संघर्षात आतापर्यंत 49 जणांनी जीव गमावला असून, 200 हून अधिक जखमी आहेत.

हिंसाचार का भडकला?पाकिस्तानातील या दंगलीमागे जमिनीचा तुकडा असल्याचे सांगितले जात आहे. गुलाब मिल्ली खेल आणि मिडगी कुल्ले, या आदिवासी समुदायांमध्ये 30 एकर जमिनीसाठी अनेक दशकांपासून वाद सुरू आहे. गुलाब मिली खेळ शिया समुदायाचा आहे, तर मिदागी कुल्ले खेल सुन्नींचा आहे. गेल्या वर्षी जुलैमध्येही याच जमिनीच्या तुकड्यावरुन वाद झाला होता. त्यावेळी कुर्रममध्ये झालेल्या जातीय संघर्षात अर्धा डझनहून अधिक लोक मारले गेले. आता पुन्हा एकदा खैबर पख्तूनख्वा भागातील कुर्रम जिल्ह्यात असलेल्या जमिनीच्या तुकड्यासाठी दोन आदिवासी समुदायांमध्ये संघर्ष पेटला आहे. 

सध्या सर्व शाळा, महाविद्यालये बंद गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष पुन्हा पेटल्यामुळे सर्व शैक्षणिक संस्था आणि बाजारपेठा तात्काळ बंद ठेवण्यात आल्या असून, मुख्य रस्त्यांवरील वाहतूकही दिवसभर बंद ठेवण्यात आली आहे. दंगलग्रस्त भागात पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय