भारताला डिवचण्यासाठी पाकिस्ताननं नव्या ‘तैमूर’च परीक्षण केलं, पण क्षेपणास्त्राचं लक्ष्य मात्र हुकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 20:25 IST2026-01-04T20:18:40+5:302026-01-04T20:25:11+5:30
Pakistan Taimoor Cruise Missile: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. दरम्यान, भारताला डिवचण्यासाठी पाकिस्तानने ३ जानेवारी रोजी स्वदेशी बनावटीच्या तैमूर या हवेतून मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.

भारताला डिवचण्यासाठी पाकिस्ताननं नव्या ‘तैमूर’च परीक्षण केलं, पण क्षेपणास्त्राचं लक्ष्य मात्र हुकलं
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. दरम्यान, भारताला डिवचण्यासाठी पाकिस्तानने ३ जानेवारी रोजी स्वदेशी बनावटीच्या तैमूर या हवेतून मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमधून हे क्षेपणास्त्र आपला लक्ष्यभेद करण्यात चुकल्याचं दिसत आहे.
तैमूर हे एक आधुनिक सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ते लढाऊ विमानांवरून लॉन्च केलं जातं. तसेच हे क्षेपणास्त्र युरोपिनय स्टॉर्म शॅडो/स्कॅल्पसारखं आहे. असंच क्षेपणास्त्र भारताकडून राफेल विमानांवर वापरण्यात येतं. भारताकडील याच क्षेपणास्त्राचा सामना करण्यासाठी तैमूरची निर्मिती करण्यात आली आहे. चाचणीदरम्यान, तैमूर क्षेपणास्त्र यशस्वीरीत्या वेगळं झालं. इंजिन सुरू झालं. तसेच त्याने लक्ष्याचा वेध घेतला.
या चाचणीनंतर पाकिस्ताचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या मोहिमेत सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांसह सर्वांचं अभिनंदन केलं आहे. मात्र सोशल मीडियावरील व्हिडीओंमध्ये तैमूर निर्धारित केलेल्या लक्ष्यापासून बाजूला जाऊन आदळल्याचे दिसत आहे.