शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
5
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
6
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
7
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
8
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
9
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
10
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
11
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
12
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
13
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
14
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
15
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
16
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
17
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
18
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
19
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
20
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा

महिलांसंदर्भातील 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून 'प्‍लेबॉय' इमरान खान चांगलेच अडकले, चुंबन घेतानाचे फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 5:05 PM

PM Imran Khan : कधीकाळी 'प्लेबॉय' प्रतिमेसाठी ओळखले जाणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान बलात्कारासाठी महिलांचे कमी कपडेच जबाब आहेत, असे वक्तव्य करून चांगलेच अडकले आहेत. यामुळे, खुद्द पाकिस्तानी लोकच सोशल मीडियावर पंतप्रधानांच्या या असल्या विचारसरणीवर निशाणा साधताना दिसत आहेत.

इस्लामाबाद - कधीकाळी 'प्लेबॉय' प्रतिमेसाठी ओळखले जाणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान बलात्कारासाठी महिलांचे कमी कपडेच जबाब आहेत, असे वक्तव्य करून चांगलेच अडकले आहेत. यामुळे, खुद्द पाकिस्तानी लोकच सोशल मीडियावर पंतप्रधानांच्या या असल्या विचारसरणीवर निशाणा साधताना दिसत आहेत. एवढेच नाही, तर, आता इमरान खान यांचे अगदी कमी कपड्यांवरील महिलांसोबत चुंबन घेत असल्याची आणि पार्टी करत असल्याचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. (Pakistan playboy PM Imran Khan came into rape controversy kissing pictures with women viral)

बलात्कार टाळण्यासाठी महिलांना बुरखा घालण्याचा सल्ला देणाऱ्या इमरान खान यांनी आता केवळ आपल्या वक्तव्याचा बचावच केला नाही, तर महिलांच्या कमी कपडे घातलण्याचा परिणाम पुरुषांवर होतो, असेही म्हटले आहे. एका मुलाखतीदरम्यान, बलात्काराचा संबंध अश्लिलतेशी जोडून केलेल्या वक्तव्यावर विचारले असता, ते म्हणाले, 'हे निर्थक आहे, मी तसे कधीच म्हटले नही. मी म्हटले होते, की बरुखा व्यवस्था समाजात आकर्षित होण्यापासून वाचविण्यासाठी आहे.'

'महिलांच्या कमी कपडे परिधान केल्याचा परिणाम पुरुषांवर होतो' -इमरान म्हणाले, पाकिस्तानी समाज आणि पाकिस्तानची जीवनशैली अगदी वेगळी होती. ते म्हणाले, आपण जर समाजातील आकर्षण वाढविले आणि या सर्व तरुण मुलांकडे  कोठेही जाण्याची जागा नसेल, तर त्याचे परिणाम उद्भवतात. यावर त्यांना विचारण्यात आले, की आपल्याला वाटते, ज्या महिला परिधान करतात, त्याचा आकर्षणावर परिणाम होतो?  यावर इमरान म्हणाले, 'जर एखादी महिला खूपच कमी कपडे परिधान करत असेल, तर त्याचा पुरुषांवर परिणाम होईल. हे कॉमन सेन्स आहे.

काश्मीरप्रश्न सुटला तर अण्वस्त्रांची गरज भासणार नाही; पाक पंतप्रधान इमरान खान यांचं विधान, अमेरिकेलाही घातली गळ

इमरान खान यांच्या या विधानाने आता सोशल मीडियामध्ये खळबळ उडाली आहे. प्रख्यात पाकिस्तानी महिला पत्रकार घरिदा फारूकी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 'लज्जास्पद'. आश्चर्यचकित, खूप संतप्त आहे. या विधानाचा मी तीव्र निषेध करते. नव्हे, पंतप्रधान खान साहेब, बलात्कार, हिंसाचार आणि हल्ले करणाऱ्या पुरुषांना भडकवण्यासाठी महिलांचे कपडे जबाबदार नाहीत. कदापी नाही. हे पीडितेला आरोपी ठविणे आहे आणि पुरुषांना क्लीन चिट दिल्या सारखे आहे. बलात्कार पीडितांचा अपमान करू नका.

इमरान खान यांचे परदेशी महिलांसोबत चुंबन घेतानाचे फोटो व्हायरल -पंतप्रधान इमरान यांच्या वक्तव्याचा निषेध होत असतानाच, लोक त्याच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. पाकिस्तानी वंशाचे लेखक तारिक फतह म्हणतात, 'पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटा. जगभरातील महिलांसोबत असंख्यवेळा लैंगिक कृत्य करणारे इमरान खान सध्या आपल्या चौथ्या पत्नीसोबत आहेत. आपल्या देशातील महिलांना बलात्कारापासून वाचवण्यासाठी ते बुरख्याला प्रोत्साहन देत आहेत. एवढेच नाही तर, क्रिकेटपटू असताना इमरान यांच्या रंगेल आयुष्यातील फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या छायाचित्रांमध्ये इमरान खान परदेशी महिलांबरोबर चुंबन घेताना दिसत आहेत. यात बर्‍याच महिलांनी अगदी कमी कपडे परिधान केले आहेत.

टॅग्स :Imran Khanइम्रान खान