शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Pakistan Plane Crash : 'आगीचे लोट, असंख्य किंकाळ्या अन्...', दुर्घटनेतून बचावलेल्या 'त्याने' सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 1:27 PM

Pakistan Plane Crash : लाहोरहून कराचीला जाणारं हे विमान कराची विमानतळावर उतरण्याच्या आधी अपघातग्रस्त झालं. या भीषण विमान अपघातातून मोहम्मद झुबेर थोडक्यात बचावले आहेत.

कराची - पाकिस्तानामध्येविमानाचा भीषण अपघात झाला असून यामध्ये  तब्बल 97 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण यातून वाचले आहेत. लाहोरहून कराचीला जाणारं हे विमान कराची विमानतळावर उतरण्याच्या आधी अपघातग्रस्त झालं. या भीषण विमान अपघातातून मोहम्मद झुबेर थोडक्यात बचावले आहेत. त्यांनी या अपघाताचा भयावह अनुभव सांगितला आहे. विमान लँडिंगच्या प्रयत्नात असताना कोसळले अशी माहिती या दुर्घटनेतून बचावलेल्या मोहम्मद झुबेर यांनी दिली आहे. 

'डोळे उघडले चारही बाजुंना आगीचे लोट दिसत होते. सर्वत्र धुराचे साम्राज्य होते. काहीही दिसत नव्हतं फक्त लोकांच्या सर्व बाजूंनी किंकाळया ऐकू येत होत्या' असा भयावह अनुभव मोहम्मद यांनी सांगितला आहे. तसेच 'वैमानिकाने प्रवाशांना लँडिंग करणार असल्याचं सांगितले. त्यानंतर धावपट्टीच्या दिशेने उतरत असताना विमान कोसळले. मी माझा सीट बेल्ट काढला त्यानंतर मला प्रकाश दिसला. मी त्या दिशेने गेलो. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी मी 10 फूटावरुन उडी मारली' असं देखील मोहम्मद यांनी सांगितलं आहे. 

विमान अपघातातून मोहम्मद झुबेर आणि पाकिस्तानील बँक ऑफ पंजाबचे प्रमुख झफर मसूद बचावले आहेत. बँक ऑफ पंजाबचे सीईओ झफर मसूद यांना फक्त फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. लाहोरहून कराचीला जाणारे हे विमान पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआईए) होते. विमान रनवेपासून फक्त एक किलोमीटर दूर असताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती आता समोर आली आहे. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. याच परिसरातील एका इमारतीवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान कोसळतानाचे दृष्य कैद झाले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला असून तो जोरदार व्हायरल होत आहे.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला शुक्रवारी (22 मे) भीषण अपघात झाला आहे. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं असून यामध्ये तब्बल 97 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण यातून वाचले असल्याची माहिती मिळत आहे. पीआयएचे हे विमान कॅप्टन सज्जाद गुल उडवत होते. पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उतरण्याच्या बरोबर 10 मिनिटे आधी, विमानात तांत्रिक समस्या असल्याचे पायलटने सांगितले होते. यादरम्यान, एअर ट्राफिक कंट्रोल आणि पायलट यांच्यातील अखेरच्या संभाषणाचं रेकॉर्डिंगदेखील समोर आलं आहे. एअरबस ए320च्या पायलटचे रेकॉर्ड झालेले अखेरचे शब्द "विमानाचे इंजिन काम करत नाही," असे होते.

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Plane Crash : विमान अपघातात 97 ठार, दोघे वाचले; 'ते' भीषण दृश्य CCTV ने टिपले!

CoronaVirus News : तब्बल 18 वर्षांनी 'ते' गावी परतले पण ना आई जिवंत होती ना पत्नी...

काय सांगता? Google maps मुळे पती-पत्नीत झालं कडाक्याचं भांडण; घेतली थेट पोलिसात धाव

CoronaVirus News : अरे व्वा! 100 वर्षांच्या आजींनी जिंकलं 'कोरोना युद्ध'; टाळ्यांचा गजरात झालं स्वागत

CoronaVirus News : तंत्रज्ञानाची किमया! 'हे' खास हेल्मेट घेणार कोरोना व्हायरसचा शोध; जाणून घ्या खासियत

CoronaVirus News : कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला तर शवविच्छेदनाची गरज आहे का?; ICMRने दिली महत्त्वाची माहिती

CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाने थैमान घातलेलं असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

कुटुंब रुग्णालयात एकत्र झालं दाखल पण घरी परतली फक्त आई; मन सुन्न करणारी घटना

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAccidentअपघातDeathमृत्यूairplaneविमानAirportविमानतळ