शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान - फेसबूकवरील धर्मद्रोही पोस्टमुळे जमावाने महिलेला नातींसह जाळले

By admin | Updated: July 28, 2014 17:50 IST

फेसबूकवर धर्मद्रोही पोस्ट टाकल्यामुळे संतप्त जमावाने एका महिलेला तिच्या नातींसह जाळून ठार मारल्याची अमानुष घटना पाकिस्तानात घडली आहे

ऑनलाइन टीम
इस्लामाबाद, दि. २८ - फेसबूकवर धर्मद्रोही पोस्ट टाकल्यामुळे संतप्त जमावाने एका महिलेला तिच्या नातींसह जाळून ठार मारल्याची अमानुष घटना पाकिस्तानात घडली आहे. मृतांमध्ये एका सातवर्षीय मुलीचा व तिच्या लहान बहिणीचा समावेश असून ते अहमदी (१९८४ सालच्या पाकिस्तानी कायद्यानुसार त्यांना गैर-मुस्लिम मानण्यात येते) समुदायातील होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना इस्लामाबादपासून २२० किमी अंतरावर असलेल्या गुजरानवाला येथे घडली.  फेसबूकवर धर्मद्रोही पोस्ट टाकल्यामुळे दोन तरूणांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर रविवारी हा प्रकार घडला.  धर्मद्रोही पोस्ट टाकणा-या या तरूणावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत दीडशे लोकांचा समुदाय पोलिस स्टेशनमध्ये आला. पोलिस याप्रकरणी मध्यस्थी करत असतानाच दुसरीकडे जमाव 'अहमदीं'च्या घरावर चालून गेले व त्यांनी त्यांच्या घरावर हल्ला करत ते पेटवून टाकले. दरम्यान ज्या तरूणावर ही पोस्ट टाकण्याचा आरोप आहे, त्याला मात्र या घटनेत कोणतीही इजा झालेली नाही असे समजते.
आत्तापर्यंतच्या काळातील हा अतिशय निंदनीय हल्ला असल्याचे सांगत 'अहमदी' समुदायाचे प्रवक्ते सलीमु उद दीन यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला. तसेच हा हल्ला होऊ नये यासाठी पोलिसांनी कोणताही प्रयत्न केला नाही, ते फक्त घडलेला प्रकार पाहत उभे होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.