इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानची मध्यस्थी; १५ कलमी तडजोड कराराचा प्रस्ताव पाठवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:34 IST2026-03-25T11:31:45+5:302026-03-25T11:34:36+5:30

Iran America War: इराण-अमेरिका आणि इस्रायल युद्धात पाकिस्तानची एंट्री झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलमधील काही माध्यमांनी याबद्दलचे वृत्त दिले आहे. 

Pakistan mediates to stop Iran-US war; 15-point compromise agreement proposal sent | इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानची मध्यस्थी; १५ कलमी तडजोड कराराचा प्रस्ताव पाठवला

इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानची मध्यस्थी; १५ कलमी तडजोड कराराचा प्रस्ताव पाठवला

इराणसोबतयुद्धसंघर्ष पूर्णपणे थांबवण्यासाठी चर्चा झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धात आता पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. न्यूयॉर्क टाइम्स, रॉयटर्स आणि इस्रायलच्या चॅनल १२ या माध्यमांनी आपल्या रिपोर्ट्समध्ये याबद्दलचा उल्लेख केला आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या माध्यमातून इराणसमोर १५ कलमी तडजोड कराराचा प्रस्ताव ठेवला आहे, असे या माध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे. 

सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहे की, अमेरिकेने पाकिस्तान करवी इराणसमोर युद्धसंघर्ष थांबवण्यासंदर्भात एक प्रस्ताव दिला आहे. तडजोडीचा हा १५ कलमी करार आहे. 

पाकिस्तानने या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर या घडामोडी घडल्या आहेत. चॅनल १२ ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिका ने इराणसमोर ज्या मागण्या ठेवल्या आहेत, त्यात होर्मुझ सामुद्रधुनीचा समावेश आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यात यावी आणि एक नियंत्रण मुक्त समुद्र क्षेत्र म्हणून घोषित करावे, असा प्रस्ताव अमेरिकेकडून इराणला दिला गेला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'योग्य व्यक्तींसोबत चर्चा सुरू'  

इराणला प्रस्ताव पाठवल्याचे वृत्त समोर येण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोना्ल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, आम्ही योग्य व्यक्तींसोबत चर्चा करत आहोत आणि ते तडजोड करण्यासाठी तयार आहेत. 

व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी सांगितले, "इराणच्या सरकारने या गोष्टींवर सहमती दिली आहे की, ते कधीही अण्वस्त्र बनवणार नाहीत."
 
इराणसोबतचा शांतता करार यशस्वी होण्याची किती अपेक्षा आहे, असेही ट्रम्प यांना विचारण्यात आले. ते म्हणाले की, "हे युद्ध जिंकलो आहोत."

युद्ध थांबवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच इस्रायलचे इराणवर हल्ले

एकीकडे इराणसोबत युद्ध थांबवण्याची चर्चा सुरू असल्याचे दावे डोनाल्ड ट्रम्प करत असतानाच इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हल्ले केले. 

इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेसनी म्हटले आहे की, आम्ही राजधानी तेहरावर नव्याने हल्ले सुरू केले आहेत. इराणमधील दहशतवादी सरकारशी संबंधित अड्ड्यांवर हल्ले केले गेले आहेत. तेहरानच्या पूर्व, उत्तर आणि मध्य भागात स्फोटाचे आवाज ऐकायले आले. 

Web Title : ईरान-अमेरिका युद्ध रोकने के लिए पाकिस्तान की मध्यस्थता; १५ सूत्रीय समझौता प्रस्ताव

Web Summary : पाकिस्तान ने ईरान और अमेरिका के बीच तनाव कम करने के लिए मध्यस्थता की, १५ सूत्रीय समझौते का प्रस्ताव रखा। अमेरिका होर्मुज जलडमरूमध्य तक पहुंच चाहता है। इस बीच, इजरायल ने कथित तौर पर तेहरान पर हमला किया।

Web Title : Pakistan mediates to halt Iran-US war; offers 15-point deal.

Web Summary : Pakistan mediates between Iran and US, proposing a 15-point deal to de-escalate tensions. US seeks Hormuz Strait access. Simultaneously, Israel reportedly attacks Tehran despite ongoing negotiations.