धक्कादायक! महिला इन्स्पेक्टरचं संतापजनक कृत्य, कैदेतील महिलेला निर्वस्त्र केलं अन् सर्वांसमोर नावचवलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 15:48 IST2021-11-13T15:46:38+5:302021-11-13T15:48:18+5:30
Pakistan : ही घटना बलूचिस्तान प्रांतातील आहे. इन्स्पेक्टर शहाना इरशादला पोलीस चौकशी समितीने आपल्या अधिकाराचा गैरवापर करण्यात दोषी ठरवलं.

धक्कादायक! महिला इन्स्पेक्टरचं संतापजनक कृत्य, कैदेतील महिलेला निर्वस्त्र केलं अन् सर्वांसमोर नावचवलं...
पाकिस्तानातून (Pakistan Crime News) सतत काहीना काही विचित्र आणि धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिला पोलिसाने फारच संतापजनक कृत्य केलं आहे. त्यानंतर तिला नोकरीवरून काढण्यात आलं. महिला पोलिसाने कैदेत असलेल्या महिलेला आपले कपडे काढण्यास भाग पाडलं आणि तिला तुरूंगात डान्स करण्यासही सांगितलं. ही घटना बलूचिस्तान प्रांतातील आहे. इन्स्पेक्टर शहाना इरशादला पोलीस चौकशी समितीने आपल्या अधिकाराचा गैरवापर करण्यात दोषी ठरवलं.
समितीने सांगितलं की, शबानाने पोलीस रिमांड दरम्यान तुरूंगात कैद महिलेसोबत अमानविय कृत्य केलं. पोलीस अधिकारी मुहम्मद अजहर अकरम म्हणाले की, 'चौकशीतून आढळून आलं की, महिला इन्स्पेक्टर परी गुल नावाच्या महिलेला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली होती. तिला एका मुलीच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. तेव्हा महिला पोलीस रिमांडवर होती. त्यावेळी महिला इन्स्पेक्टर शबानाने कैद महिलेला निर्वस्त्र केलं, आणि इतर कैद्यांसमोर नाचायलाही लावलं.
कोर्टाने पीडित महिलेला कस्टडीत पाठवलं आहे. अकरम म्हणाले की, 'महिला इन्स्पेक्टरला आपला बचावात सांगण्यासाठी काहीच नव्हतं. त्यामुळे तिला नोकरीहून काढण्यात आलं'. ते म्हणाले की, 'जेव्हा एक महिला इन्स्पेक्टर एखाद्या दुसऱ्या महिलेसोबत असं करते, आणि आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करते. तेव्हा हे सहन केलं जाऊ शकत नाही'.
दरम्यान, पाकिस्तानात महिलांविरोधात गुन्हे वेगाने वाढत आहेत. परिस्थितीत इतकी वाईट झाली आहे की, महिला आता तुरूंगातही सुरक्षित नाहीत. इथे महिलांच्या हत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यावरून देशात मोठं विरोध प्रदर्शन करण्यात आलं. सरकारकडे महिलांची सुरक्षा वाढण्यासाठी मागणी केली गेली.