पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 06:34 IST2025-11-24T06:33:46+5:302025-11-24T06:34:27+5:30
मीडियात चुकीचे दावे केल्याबद्दल फ्रान्सने पाकिस्तनला फटकारले आहे.

पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडूनपाकिस्तानला मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर आता जगाकडूनही चपराक खावी लागत आहे. रविवारी फ्रान्सच्या नौदलाने पाकिस्तानी माध्यमांना फटकार लगावली असून, चुकीचे दावे दिल्याबद्दल चांगलेच सुनावले आहे.
यावर्षी ७ मे रोजी सीमेवरील तणावादरम्यान पाकिस्तानने भारतीय राफेल जेट पाडले होते, असे वृत्त देण्यात आले होते. त्यावर फ्रान्सच्या नौदलाने खुलासा करताना पाकला सुनावले आहे.
फ्रान्सचे काय म्हणणे?
फ्रान्स नौदलाने म्हटले आहे की, अधिकाऱ्याचे खरे नाव कॅप्टन इवान लॉने आहे. त्यांच्या नावाने केलेली टिप्पणी खरी नाही. इंडो - पॅसिफिक कॉन्फरन्समध्ये त्यांचे सादरीकरण पूर्णपणे तांत्रिक स्वरुपाचे होते. यात त्यांनी असेट्स, मिशन व स्ट्राइक ग्रुप कॉन्सेप्टबाबत सांगितले होते. प्रश्नोत्तरात त्यांनी भारतीय विमानाबद्दल काहीही विधान केलेले नाही.
काय आहे प्रकरण?
पाकिस्तानच्या जिओ टीव्हीच्या २१ नोव्हेंबरच्या एका रिपोर्टमध्ये जॅक्स लॉनेच्या हवाल्याने म्हटले होते की, ६-७ मे रोजी १४०पेक्षा जास्त लढाऊ विमानांमध्ये झालेल्या हवाई लढाईत पाकिस्तानच्या हवाई दलाची त्यांनी प्रशंसा केली आणि चीनच्या मदतीने भारतीय रॅफेल पाडण्यात आले होते.