पाकिस्तानमध्ये इंटरनेट बंद! दाऊद इब्राहिम की इम्रान खान, इंटरनेट बंद होण्यामागे कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 08:34 AM2023-12-18T08:34:15+5:302023-12-18T08:35:34+5:30

पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, याचे कारण अजुनही समोर आलेले नाही.

pakistan internet server down dawood ibrahim hospitalised imran khan digital jalsa | पाकिस्तानमध्ये इंटरनेट बंद! दाऊद इब्राहिम की इम्रान खान, इंटरनेट बंद होण्यामागे कोण?

पाकिस्तानमध्ये इंटरनेट बंद! दाऊद इब्राहिम की इम्रान खान, इंटरनेट बंद होण्यामागे कोण?

पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद असल्याची माहिती समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाल्याची बातमी समोर आली आहे. तेव्हापासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. 

पाकिस्तानच्या सोशल मीडियावर दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याची बातमी आल्यानंतर संपूर्ण देशातील इंटरनेट डाउन आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमध्ये इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर सारखे प्लॅटफॉर्म बंद आहेत. दरम्यान आता दाऊदच्या बातमीमुळे पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्याची आल्याची माहिती समोर आली आहे.

दाऊदला रुग्णालयात दाखल करताच पाकिस्तानच्या सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती, त्यामुळे इंटरनेट बंद करण्यात आल्याचे बोलले जात आहे.   

तर दुसरीकडे इंटरनेट बेद होण्यामागचे आणखी एक कारण सांगितले जात आहे. नेटब्लॉक्स, जगभरातील इंटरनेट, सायबर सुरक्षा आणि डिजिटल गव्हर्नन्सवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेने सांगितले की, इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाने आयोजित केलेल्या "व्हर्च्युअल पॉवर शो" दरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सर्व्हर डाउन झाले आहेत. इंटरनेट ट्रॅकिंग एजन्सीने सांगितले की, "#पाकिस्तानसह लाइव्ह मेट्रिक्स एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर बंदी घालण्यात आली आहे."

Web Title: pakistan internet server down dawood ibrahim hospitalised imran khan digital jalsa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.