शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे का? पाकिस्तान सरकारने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 09:43 IST

Imran Khan Health Update Pakistan: इम्रान खान यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या निधनाचाही दावा करण्यात येत आहे

Imran Khan Health Update Pakistan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान बऱ्याच काळापासून तुरुंगात आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर तुरुंगात पोलिसांकडून अत्याचार करण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर पाकिस्तान सरकारने कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत प्रचंड चर्चा रंगल्या आहेत. काहींच्या मते त्यांची प्रकृती खालावली आहे, तर काहींनी इम्रान यांच्या निधनाचाही दावा केला आहे. या सर्व चर्चांदरम्यान आता पाकिस्तान सरकारकडून काही गोष्टींची स्पष्टता करण्यात आली आहे.

इम्रान खान यांची प्रकृती उत्तम

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आदियाला तुरुंगात पुरवल्या जाणाऱ्या परिस्थिती आणि सुविधांबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत आता माहिती समोर आली आहे. रावळपिंडीतील आदियाला तुरुंगाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे की PTIचे संस्थापक इम्रान खान यांचे निधन झालेले नाही. त्यांची प्रकृती उत्तम आहे. प्रशासनाने म्हटले आहे की इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. इम्रान खान यांना सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत.

संरक्षणमंत्र्यांनी सुविधांची यादीच वाचली

इम्रान खान यांच्या तुरुंगातील परिस्थितीबद्दल वाढत्या प्रश्नांदरम्यान, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही माहिती दिली. त्यांनी दावा केला की इम्रान खान यांना तुरुंगात पूर्वीपेक्षा खूप जास्त आराम आणि सुविधा मिळत आहे. आसिफ यांनी उपहासात्मक टिप्पणी केली की खान यांना जे जेवण दिले जाते, ते पंचतारांकित हॉटेलच्या मेन्यूपेक्षाही चांगले आहे. त्यांना टीव्ही देण्यात आला आहे. व्यायामासाठी फिटनेस मशीन देखील आहेत. इम्रान खान यांना तुरुंगात डबल बेड, मखमली गादी आणि इतर चांगल्या सुविधाही देण्यात आल्या आहेत.

मृत्यूची अफवा का पसरली?

इम्रान खान यांच्या बहिणी अलिमा खान, नोरीन नियाझी आणि डॉ. उज्मा खान यांनी त्यांच्या समर्थकांसह तुरुंगाबाहेर धरणे आंदोलन केले. त्यांनी आरोप केला की त्यांना इम्रान खानला भेटू दिले जात नाही. निदर्शनादरम्यान, पंजाब पोलिसांनी जबरदस्तीने मारहाण केल्याचेही आरोप समोर आले. ७१ वर्षीय नोरीन खान यांनी दावा केला की त्यांना केस धरून ओढण्यात आले आणि इतर महिलांवरही हल्ला करण्यात आला. या घटनांमध्ये, इम्रान खान यांच्या अचानक मृत्यूच्या आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवल्याच्या अफवाही सोशल मीडियावर पसरू लागल्या. तथापि, यापैकी कोणत्याही दाव्याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. उलट इम्रान यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Imran Khan Alive and Well, Pakistan Government Denies Death Rumors

Web Summary : Pakistan denies rumors of Imran Khan's death, confirming he's healthy and receiving necessary medical care. Ministers claim he enjoys comfortable prison conditions, countering claims of mistreatment amid protests by his sisters who allege they are being denied visitation.
टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानPrisonतुरुंगjailतुरुंगDeathमृत्यूHealthआरोग्य