पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:09 IST2025-05-13T15:55:20+5:302025-05-13T16:09:57+5:30
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पुन्हा एकदा सिंधू जल करारावरुन भारताला इशारा दिला आहे.

पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
India Pakistan War ( Marathi News ) : गेल्या दिवसापासून भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेला तणाव आता निवळला आहे. युद्धविरामावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी एकमेकांशी चर्चा केली आहे आणि युद्धविरामला हिरवा कंदील दाखवला. युद्धविरामला अंतिम स्वरूप देऊन काही तासच उलटले तोच पाकिस्तानी मंत्र्यांनी पुन्हा एकदा युद्धविरामाचे उल्लंघन करण्याचा इशारा देण्यास सुरुवात केली आहे.
जर भारत आणि पाकिस्तानमधील पाणी वाद मिटला नाही तर हा युद्धविराम फार काळ टिकणार नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी म्हटले आहे.
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
पाकिस्तानी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, इशाक दार म्हणाले की, "जर पाण्याच्या वाटपावर कोणताही करार झाला नाही तर 'अॅक्ट फॉर वॉर' मानले जाईल. त्यांनी काश्मीर प्रश्नाला या संपूर्ण लढाईचे मूळ कारण असल्याचेही सांगितले.
सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वाटपावरून दोन्ही देशांमध्ये अनेकदा वाद निर्माण झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने १९६० चा सिंधू पाणी करार रद्द केला. पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील संघर्षाचे कारण बनला आहे.
सिंधू जल करार काय होता?
१९६० च्या सिंधू जल करारानुसार, पाकिस्तानला सिंधू, चिनाब आणि झेलम नद्यांचे पाणी देण्यात आले आणि भारताला रावी, बियास आणि सतलज नद्यांचे पाणी देण्यात आले. २२ एप्रिल रोजी पुलवामा हल्ल्यानंतर भारताने हा करार रद्द केला. १२ मे रोजी झालेल्या युद्धविराम अंतर्गत, दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला न करण्याचे मान्य केले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
शोपियानसह विविध भागात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून मोहीम राबवली जात आहे. मंगळवारी(13 मे) सकाळी अशाच एका कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी शोपियानच्या जामपाथरीमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेले दहशतवादी पहलगाम हल्ल्यातील दोषी नव्हते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दल वेगवेगळ्या ठिकाणी विशेष मोहिमा राबवत आहेत.