शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पाकिस्तान हादरलं! पेशावरमधील मदरशात मोठा स्फोट; ७ बालकांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी

By कुणाल गवाणकर | Published: October 27, 2020 10:26 AM

Pakistan Peshawar madrasa blast: पेशावरमधील दिर कॉलनीतील मदरशात स्फोट; अनेकांची प्रकृती गंभीर

पेशावर: पाकिस्तानच्या पेशावरमधील एका मदरशाजवळ स्फोट झाला आहे. दिर कॉलनीत असलेल्या मदरशाजवळ झालेल्या स्फोटात ७ बालकांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू झालं आहे. जखमी बालकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे. यातील अनेक बालकांची प्रकृती गंभीर आहे.पाकिस्तानच्या डॉन न्यूजनं पोलिसांच्या हवाल्यानं दुर्घटनेत ७ बालकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त दिलं आहे. या स्फोटामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे.खैबर पख्तुनख्वाचे पोलीस प्रमुख डॉ. सनाउल्लाह अब्बासी आणि एसएसपी मंसूर अमन यांनी स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'स्फोटात जखमी झालेल्यांना एलआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटाच्या कारणांचा तपास सुरू आहे. या स्फोटामागचा नेमका उद्देश अद्यापपर्यंत समजलेला नाही. मदरशात मुलांचा अभ्यास सुरू असताना जोरदार स्फोट झाला,' अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.एलआर रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद कासिम यांनी आतापर्यंत रुग्णालयात ७ जणांचे मृतदेह आणि ७० पेक्षा अधिक जखमींना आणण्यात आल्याची माहिती दिली. जखमींवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले आहेत. रुग्णालयात आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांना तातडीनं रूजू होण्यास सांगण्यात आल्याची माहिती कासिम यांनी दिली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान