पाकिस्तानचा पुन्हा पूँछमध्ये गोळीबार

By Admin | Updated: October 18, 2014 10:22 IST2014-10-18T10:20:25+5:302014-10-18T10:22:16+5:30

पाकिस्तानच्या कारवाया अद्याप सुरूच असून शुक्रवारी रात्री पाकिस्तानने पुन्हा पूँछ जिल्ह्यात गोळीबार केला.

Pakistan fires again in the tail | पाकिस्तानचा पुन्हा पूँछमध्ये गोळीबार

पाकिस्तानचा पुन्हा पूँछमध्ये गोळीबार

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर दि. १८ - पाकिस्तानच्या कारवाया अद्याप सुरूच असून शुक्रवारी रात्री पाकिस्तानने पुन्हा पूँछ जिल्ह्यात गोळीबार केला. पूँछ जिल्ह्यातील हमीरपूर सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर पाकिस्तानच्या जवानांनी गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून भारतीय जवानांनीही या गोळीबारास चोख प्रत्युत्तर दिले. गेल्या तीन दिवासत पाकिस्तानने तीनवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला आहे.

पाकिस्तानच्या या कारवायामुळे सीमेवरील गावातील हजारो नागरिकांना गावातून स्थलांतर करावे लागले असून ते बेघर झाले आहेत.

 

Web Title: Pakistan fires again in the tail