शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 19:17 IST

Imran Khan mentally ill: इम्रान खान यांना पाकिस्तानी लष्कराने 'मानसिकदृष्ट्या आजारी' घोषित केले

Imran Khan mentally ill: आदियाला तुरुंगात कैद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानी लष्कराने 'वेडा' म्हणजेच 'मानसिकदृष्ट्या आजारी' घोषित केले आहे. लष्कराच्या प्रवक्त्याने एक औपचारिक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, इम्रान खान आता मानसिकरित्या आजारी आहेत. ते जी विधान करत आहेत ते सारेकाही देशविरोधी आहे. ते देशद्रोही लोकांची भाषा बोलू लागले आहेत. इम्रान खान तुरुंगातून नागरिकांना सैन्याविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे आता सहन केले जाणार नाही.

इम्रान खानची भाषा देशविरोधी

जिओ टीव्ही उर्दूनुसार, लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, इम्रान खान देशविरोधी भाषा बोलत आहेत. ते प्रत्येक वक्तव्यात शेख मुजीबुर रहमान यांचे नाव घेत आहेत. हा देशाशी विश्वासघात आहे. १९७१ मध्ये पाकिस्तानची फाळणी मुजीबुर रहमान यांनीच केली होती. त्यांचा उल्लेख करणे देशविरोधी आहे.

तीन दिवसांत काय बदललं?

इम्रान खान आणि त्यांची बहीण उज्मा यांच्या भेटीनंतर अवघ्या तीन दिवसांतच इम्रान यांना 'वेडा' घोषित करण्यात आले. भावाला भेटल्यानंतर उज्मा यांनी त्यांना पूर्णपणे निरोगी असल्याचे म्हटले होते. मग प्रश्न असा आहे की, इम्रान खान अवघ्या तीन दिवसांत मानसिकरित्या आजारी कसे झाले? असा सवाल विचारला जात आहे.

लष्कराच्या निवेदनात आणखी काय?

अहमद शरीफ चौधरी यांच्या मते, कलम १९ अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आहे. पण त्यात कुठेही असे म्हटलेले नाही की विरोधी पक्ष लोकशाहीची व्याख्या ठरवेल. आम्ही उच्चभ्रू वर्गातील नाही, म्हणून आमचा वापर केला जातो. प्रत्येक मुद्द्यात सैन्याला ओढले जाते. इम्रान खान प्रत्येक वेळी बैठकीत लष्करप्रमुखांविरुद्ध विधाने करत आहेत. "आम्ही कोणालाही पाकिस्तानी सैन्य आणि जनतेमध्ये दरी निर्माण करू देणार नाही. आम्ही तुम्हाला लोकांना सैन्याविरुद्ध भडकवू देणार नाही. आम्ही तुम्हाला सैन्य आणि जनता यांच्यात मतभेद निर्माण करण्याची संधी देणार नाही."

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Army Declares Imran Khan 'Mentally Ill,' Anti-National

Web Summary : Pakistan's army has declared Imran Khan mentally unstable, accusing him of anti-national statements. They allege he's inciting citizens against the military and using divisive rhetoric reminiscent of past betrayals. This declaration comes shortly after his sister claimed he was healthy.
टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान