Pakistan Actresses, Army Exposed: जनरल बाजवा, फैज यांचे पाकिस्तानी अभिनेत्रींसोबत शरीर संबंध; माजी सैन्याधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 15:34 IST2023-01-03T15:33:01+5:302023-01-03T15:34:43+5:30

पाकिस्तानी सैन्याचे वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानी अभिनेत्रींचा वापर देशाच्या नेत्यांना हनीट्रॅप करण्यासाठी करायचे. अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

Pakistan Actresses, Army Exposed: EX General Bajwa, ISIS chief Faiz's sexual relationship with Pakistani actresses; A claim by an ex-army officer | Pakistan Actresses, Army Exposed: जनरल बाजवा, फैज यांचे पाकिस्तानी अभिनेत्रींसोबत शरीर संबंध; माजी सैन्याधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

Pakistan Actresses, Army Exposed: जनरल बाजवा, फैज यांचे पाकिस्तानी अभिनेत्रींसोबत शरीर संबंध; माजी सैन्याधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

पाकिस्तानमध्ये गेल्याच महिन्यात निवृत्त झालेल्या लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि आयएसआयचे माजी चिफ जनरल फैज यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्याच माजी अधिकाऱ्याने आणि माजी सैनिकांच्या सोसायटीच्या माजी प्रवक्त्याने हे आरोप केले आहेत. 

निवृत्त मेजर आदिल राजा यांनी हे आरोप केल आहेत. ते सध्या लंडनमध्ये आहेत. पाकिस्तानी सैन्याचे वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानी अभिनेत्रींचा वापर देशाच्या नेत्यांना हनीट्रॅप करण्यासाठी करायचे. जनरल बाजवा आणि फैज हे अधिकारी या अभिनेत्रींना आयएसआयच्या मुख्यालयात किंवा सेफ हाऊसमध्ये घेऊन जायचे आणि त्यांच्याशी शरीर संबंध ठेवायचे असा दावा राजा यांनी केला आहे.  

आपल्या व्हिडीओ ब्लॉगमध्ये राजा यांनी हे दावे केले आहेत. यामुळे पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीसह लष्कर आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हे आयएसआय अधिकारी या अभिनेत्रींना हनीट्रॅप करण्यासाठी देशातील राजकारणी आणि इतर शक्तिशाली लोकांकडे पाठवतात आणि नंतर त्यांचे व्हिडिओ बनवतात. आदिल राजा यांनी सुरुवातीला या अभिनेत्रींची नावे घेतली नाहीत, त्यांचा फक्त MH, MK आणि SA अशा नावांनी उल्लेख केला आहे. 

या खळबळजनक दाव्यानंतर, मेहविश हयात, माहिरा खान, सजल अली आणि कुबरा खान या अभिनेत्रींच्या फोटोंसह आदिल राजा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर घुमजाव करताना आदिल राजा यांनी पाकिस्तानसह संपूर्ण जगात मी नमूद केलेल्या नावांसह अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्री आहेत. आदिल राजाच्या या दाव्यावरून पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

वादग्रस्त पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात, माहिरा खान, सजल अली आणि कुब्ब्रा खान यांनी आदिल राजाच्या दाव्याचा तीव्र निषेध केला आहे. चाहत्यांनी अभिनेत्रींना मानहानीचा खटला दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. मेहविश हयात तीच अभिनेत्री आहे जिचे नाव माफिया डॉन दाऊद इब्राहिमशीही जोडले गेले होते. आदिल राजाचा हा आरोप खरा असेल तर त्यातून पाकिस्तानी लष्कराचा घृणास्पद चेहरा समोर येत आहे. इम्रान खानचे असेच अनेक सेक्स ऑडिओ लीक झाले असून ISI वर याचा आरोप करण्यात येत आहे. 

Web Title: Pakistan Actresses, Army Exposed: EX General Bajwa, ISIS chief Faiz's sexual relationship with Pakistani actresses; A claim by an ex-army officer