पाकिस्तानमध्ये एक्स्प्रेसला भीषण आग; 65 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 11:25 IST2019-10-31T09:04:45+5:302019-10-31T11:25:10+5:30

पाकिस्तानमध्ये एका एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Pakistan 16 people killed in fire in Karachi-Rawalpindi Tezgam express train | पाकिस्तानमध्ये एक्स्प्रेसला भीषण आग; 65 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी 

पाकिस्तानमध्ये एक्स्प्रेसला भीषण आग; 65 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी 

ठळक मुद्देपाकिस्तानमध्ये एका एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.आगीत आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे.

कराची - पाकिस्तानमध्ये एका एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये गुरुवारी (31 ऑक्टोबर) सकाळी कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला भीषण आग लागली आहे. आगीने रौद्र रुप धारण केले आहे. या आगीत 65 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सिलिंडर स्फोटामुळे एक्स्प्रेसमध्ये आग लागली. एक्स्प्रेसच्या सुरुवातीच्या तीन डब्यांमध्ये आग पसरली. काही प्रवाशांनी स्वतः चा जीव वाचवण्यासाठी एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू आहे.  

 

Web Title: Pakistan 16 people killed in fire in Karachi-Rawalpindi Tezgam express train