मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लख्वीची सुटका करण्याचा पाक कोर्टाचा आदेश
By Admin | Updated: March 13, 2015 14:55 IST2015-03-13T11:37:32+5:302015-03-13T14:55:36+5:30
मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी इस्लामाबाद न्यायालयाने जामीन मंजूर केला असून त्याची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लख्वीची सुटका करण्याचा पाक कोर्टाचा आदेश
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १३ - मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत इस्लामाबाद कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे. लख्वीची तत्काळ सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
लख्वी हा फेब्रुवारी २००९ पासून तुरूंगात असून त्याच्यावर मुंबई हल्ल्याप्रकरणी खटला सुरू आहे. मात्र त्याच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याने पाकिस्तानी न्यायालयाने गेल्या वर्षी त्याची सुटका केली होती. भारत सरकारने यावर नाराजी नोंदवत या निर्णयाचा निषेध केला होता. त्यानंतर पाकिस्तान सरकारने लख्वीला दुस-या एका प्रकरणात पुन्हा ताब्यात घेतल्याने त्याचा तुरूंगातील मुक्काम कायम राहिला. मात्र आद पुन्हा इस्लामाबाद न्यायालायने त्याच्या सुटकेचा आदेश दिल्याने खळबळ माजली आहे.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जण मृत्युमखी पडले होते, तर शेकडो जण गंभीर जखमी झाले होते.