"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 21:11 IST2026-04-09T21:08:56+5:302026-04-09T21:11:04+5:30

इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणने आमचे हात अजूनही रिव्हॉल्व्हरच्या घोड्यावरच असल्याचे सांगत थेट हल्ल्याची धमकी दिली आहे. शस्त्रसंधीनंतर इस्रायलने लेबनानवर केलेल्या हल्ल्यावरून इराण आक्रमक झाला आहे. 

"Our hands are still on the trigger", agitated Iran's open threat to Israel, aggressive after Lebanon | "आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक

"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक

"इराण आपल्या लेबनानी बंधू आणि भगिनींना कधीही एकटं सोडणार नाही", असे सांगत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी इस्रायलला हल्ले करण्याची खुली धमकी दिली आहे. इस्रायलने शस्त्रसंधी झाल्यानंतर लेबनानमध्ये हल्ले केले. ज्यात २०० पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत. त्यानंतर इराणने इस्रायलविरोधात आक्रमक झाला आहे. 

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हिजबुल्लाहवरील हल्ले सुरूच ठेवणार असल्याचे सांगत लेबनानला लक्ष्य केले जाणार असल्याचे विधान केले. त्यानंतर इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायला युद्धासाठी तयार असल्याचे सांगत दंड थोपटले. 

आमचे हात बंदूकीच्या घोड्यावरच आहेत -इराण

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी एक पोस्ट करत म्हटले की, "लेबनानविरुद्ध ज्यूवादी सरकारने नव्याने घेतलेली आक्रमक भूमिका युद्धविरामाचे पूर्णपणे उल्लंघन करणारी आहे. हे असे करणे म्हणजे एकप्रकारे फसवणूक आणि शस्त्रसंधीचे पालन न करण्याचेच संकेत देतात आणि यामुळे ज्या वाटाघाटी झाल्या आहेत, त्या निरर्थक ठरतात. पण, आमचा हात ट्रिगरवरच आहे. इराण आपल्या लेबनानी भाऊ आणि बहि‍णींना एकट सोडणार नाही", असे इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले आहेत. 

हिजबुल्लाहचा उल्लेख, नेतन्याहूंनी काय दिला इशारा?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनानमधील हल्ल्यांबद्दल बोलताना सांगितले की, "हिजबुल्लाहवर आम्ही पूर्ण शक्तीने, अचूक आणि निर्धाराने हल्ले करणे सुरूच ठेवले आहेत. बेरुतमध्ये आम्ही अली युसूफ खर्शी याला ठार केले आहे, हा हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेचा सरचिटणीस नईम कासिम याचा खासगी सचिव आणि त्याच्या अत्यंत जवळच्या माणसांपैकी एक होता." 

हिजबुल्लाहचे अड्डे आणि शस्त्रास्त्रे नष्ट

पंतप्रधान नेतन्याहू पुढे म्हणाले की, "८ एप्रिल रोजी रात्री इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) दक्षिण लेबनानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले. यात हजारो शस्त्रास्त्र, रॉकेट्स आणि ते वाहून नेण्यासाठी वापरले जाणारे रस्ते, शस्त्रास्त्रांचे साठे, लाँचर्स, हिजबुल्लाहचे मुख्यालय हे उद्ध्वस्त केले आहेत."

"आमची भूमिका स्पष्ट आहे जो कोणीही इस्रायलच्या नागरिकाच्या जिवाला धोका पोहचेल असे कृत्य करेल, त्याच्यावर हल्ला केला जाईल. जोपर्यंत उत्तरेकडील (इस्रायलच्या उत्तरेत राहणारे) नागरिकांची सुरक्षा पूर्णपणे पूर्वस्थितीत आणत नाही, तोपर्यंत आम्ही जिथे गरज पडेल, तिथे हिजबुल्लाहवर हल्ले करत राहू", असे सांगत नेतन्याहूंनी लेबनानमध्ये आणखी हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. 

Web Title : लेबनान हमलों के बाद ईरान ने इस्राइल को धमकी दी: हाथ अभी भी ट्रिगर पर

Web Summary : लेबनान में हमलों के बाद ईरान ने इस्राइल को धमकी दी। राष्ट्रपति रईसी ने युद्धविराम उल्लंघन का हवाला देते हुए जवाबी कार्रवाई की चेतावनी दी। नेतन्याहू ने हिजबुल्लाह के खिलाफ लगातार हमले करने की कसम खाई, जिससे तनाव और बढ़ गया।

Web Title : Iran Warns Israel: Hands Still on Trigger After Lebanon Attacks

Web Summary : Iran threatens Israel after attacks in Lebanon. President Raisi warns of retaliation, citing ceasefire violations. Netanyahu vows continued strikes against Hezbollah, targeting leaders and infrastructure, escalating tensions further.