दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 18:42 IST2025-09-07T18:41:25+5:302025-09-07T18:42:26+5:30
Operation Sindoor: भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरद्वारे लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय असलेल्या मरकझला पाडले होते.

दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
Operation Sindoor: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे ७ मे रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे नष्ट केले. यामध्ये लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय असलेल्या मरकझ तैयबाचाही समावेश आहे. भारतीय हवाई दलाने मरकझ तैयबाच्या संकुलातील तीन इमारतींचे मोठे नुकसान झाले होते. आता पाकिस्तानी सरकारनेच हे मरकज जमीनदोस्त केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात ज्या तीन इमारतींचे तिथे दहशतवाद्यांचे प्रशिक्षण, राहण्यासाठी व्यवस्था आणि शस्त्रे ठेवली जायची. हल्ल्यात या इमारतींचे ७० टक्के नुकसान झाले होते. लष्कर-ए-तैयबाने आता त्यांचे मुख्यालय पुनर्बांधणीचे काम सुरू केले आहे. नुकसानग्रस्त मुख्यालयाची पुनर्बांधणी करण्यासाठी, लष्कर-ए-तैयबाने या तिन्ही इमारती पाडल्या आहेत.
१.०९ एकर परिसरात ढिगारा
एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, मरकझ तैयबाचा संपूर्ण १.०९ एकर परिसर आता ढिगाऱ्यात रूपांतरित झाला आहे. कोसळलेल्या इमारतींचे ढिगारे सर्वत्र पडलेले स्पष्टपणे दिसून येत आहे. पाकिस्तान सरकारने घोषणा केली होती की, भारतीय हल्ल्यात नुकसान झालेल्या सर्व इमारती पाकिस्तान सरकार पुनर्बांधणी करेल आणि पुनर्बांधणीचा खर्चही देईल. त्यामुळेच आता या इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे.