Operation Sindoor 2.0: भारताने दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानला दिलेला संदेश ही केवळ एक सुरुवात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करून एअरस्ट्राईकची अचूकता दाखवून दिली. यामध्ये सुमारे १०० दहशतवादी मारले गेले. या हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच हादरला. तरीही भारतीय लष्कराने म्हटले आहे की मिशन ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. यावरून हे स्पष्ट होते की पाकिस्तानवरील धोका अद्याप टळलेला नाही. कारण ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये काहीही घडू शकते.
बलूच नागरिक, स्थानिक पोलीस पाक सरकारवर नाराज
भारत सध्या शांत आणि संयमी मनःस्थितीत आहे. भारताने राजकीयदृष्ट्या पाकिस्तानला एकटे पाडण्याचा योग्य तो प्लॅन केला आहे आणि अंंमलबजवाणीही सुरू आहे. त्यातच बलुच लोक पाकिस्तान सरकारवर अजिबात खूश नाहीत. एवढेच नाही तर तेथील स्थानिक पोलिसही सरकार आणि लष्कराच्या कृतींवर नाराज आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तानमध्ये अंतर्गत कलह तीव्र होऊन पाकिस्तानची आणखी दोन भागांत फाळणी करण्याची भारताकडे सुवर्णसंधी आहे. यामुळे जगाला एक मजबूत संदेश जाईल की जर कोणत्याही देशाने भारताशी पंगा घेतला, तर भारतीय सैन्यातील प्रत्येक सैनिक शत्रूसाठी काळ बनून अंगावर चाल करेल.
ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये काय होईल?
बलुचिस्तान हा पाकिस्तानसाठी 'दुखरी नस' आहे. पाकिस्तान सरकार याबाबत शक्य तितके मौन बाळगतो. असे मानले जाते की ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये भारत पाकिस्तानला बलूचिस्तान वेगळे करण्यास भाग पाडायाला लावून त्रास देऊ शकतो. ऑपरेशन सिंदूर २.० मध्ये भारत १९७१ च्या युद्धाप्रमाणे बलुचिस्तानला वेगळे करण्याची योजना आखू शकतो. यामुळे संपूर्ण जगाला भारताची शक्ती कळेल. असे घडल्यास केवळ पाकिस्तानच नव्हे तर त्यांना पाठिंबा देणारे चीन आणि तुर्कस्थानलाही संदेश जाईल.
एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानची पळापळ
आज झालेला ऑपरेशन सिंदूर हा केवळ एक ट्रेलर असल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी, भारताने हे स्पष्ट केले आहे की दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांसाठी कोणतीही हयगय बाळगली जाणार नाही. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्येही भीतीचे वातावरण आहे. पंजाब प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आजच्या एअरस्ट्राईकला 'युद्धासाठीची चिथावणी' म्हटले आहे आणि प्रत्युत्तर देण्याबद्दल दर्पोक्तीही केली आहे. पण लष्करप्रमुख मुनीर अजूनही गप्प आहेत. त्यामुळे भारताच्या या कृतीतून पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वावरचा दबाव स्पष्टपणे दिसून येतो.