शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

'या' देशात केवळ एकच कोरोना रूग्ण,संक्रमणाची साखळी तोडण्यात मोठं यश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:08 PM

लॉकडाऊन देखील हटवण्यात आले असून हळूहळू येथील जनजीवन पूर्ववत होत आहे.

भारतात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. सर्वच देशांना या समस्येवर कसं नियंत्रण मिळवायचं हा प्रश्न भेडसावत आहे. अनेक देशातील नागरिक लॉकडाऊनचं काटेकोर पालन करत नाहीत. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.  न्युझिलंडमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच  परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे.

कोरोना व्हायरसचे पहिले प्रकरण डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये समोर आले होते. पाहता-पाहता हा व्हायरस जगभरात पसरला. यामुळेच जगभरात लॉकडाउन घोषित करावे लागले आहे. कोरोना व्हायरस हा सगळ्यांचीच डोकेदुखी ठरत असताना असाही एक देश आहे, ज्याने कोरोनावर मात करत विजय मिळवला आहे. ५० लाख लोकसंख्या असणा-या या देशात आता केवळ एकच कोरोना रूग्ण आहे. 22 कोरोना रुग्ण खबरदारी म्हणून सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. देशात 1500 प्रकरणं समोर आली होती आणि त्यापैकी 21 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 

पंतप्रधान जेसिंडा यांनी 23 मार्चला एक महिन्याचा लॉकडाऊन जारी केला होता. त्यावेळी देशात फक्त 200 च्या आसपास प्रकरणं होती आणि कुणाचाही मृत्यू झाला नव्हता. म्हणजे फक्त 4 आठवड्यांच्या कालावधीत देशातील संक्रमणाची साखळी तोडण्यात देशाला यश मिळालं. मे महिन्यात एकही नवीन कोरोना रूग्ण येथे आढळलेला नाही. 

त्यामुळे लॉकडाऊन देखील हटवण्यात आले असून हळूहळू येथील जनजीवन पूर्ववत होत आहे. तरीही येथे काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. लॉकडाऊनदरम्यान  सीमा प्रतिबंध, क्वारंटाइन, आयसोलेशन, डिस्टन्सिंग आणि लोकांच्या वागण्यातील बदल यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात न्युझिलंड यशस्वी ठरले. त्यामुळेच न्युझिलंडचे उदाहरण जगभरात दिले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या