"डोनाल्ड ट्रम्पच हेच जगात शांतता प्रस्थापित करू शकतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 08:29 IST2026-03-21T08:27:52+5:302026-03-21T08:29:17+5:30

होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला जपानसह अनेक देशांनी प्रतिसाद दिला नसल्याच्या ट्रम्प यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ताकाइची यांनी अमेरिकेत व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. इराणच्या अणू कार्यक्रम विकासाला जपानचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. माझा ठाम विश्वास आहे की,  तुम्हीच संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित करू शकता, असेही त्या म्हणाल्या.  

Only Donald Trump can bring peace to the world Takaichi | "डोनाल्ड ट्रम्पच हेच जगात शांतता प्रस्थापित करू शकतात"

"डोनाल्ड ट्रम्पच हेच जगात शांतता प्रस्थापित करू शकतात"

वॉशिंग्टन : जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या दृढ संबंधांबाबत आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. तसेच, सध्याच्या तणावांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्पच जगभरात शांतता प्रस्थापित करू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला जपानसह अनेक देशांनी प्रतिसाद दिला नसल्याच्या ट्रम्प यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ताकाइची यांनी अमेरिकेत व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. इराणच्या अणू कार्यक्रम विकासाला जपानचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. माझा ठाम विश्वास आहे की,  तुम्हीच संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित करू शकता, असेही त्या म्हणाल्या.  

पर्ल हार्बरची आठवण -
राष्ट्राध्यक्षांच्या ओव्हल ऑफिसमध्ये ३० मिनिटांच्या संवादादरम्यान ट्रम्प पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना, ताकाइची सतत घड्याळाकडे पाहत असल्याचे दिसल्या. 

इराणवरील हल्ल्यांपूर्वी अमेरिकेने जपानसारख्या मित्र राष्ट्रांना माहिती का दिली नाही, असे पत्रकारांनी विचारले, तेव्हा ट्रम्प ताकाइचींकडे पाहत म्हणाले, ‘आम्हाला सर्वांना आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. असे धक्के देणे जपानपेक्षा चांगले कुणाला माहीत असणार?, तुम्ही आम्हाला पर्ल हार्बर हल्ल्याबद्दल का सांगितले नव्हते?’ 

ट्रम्प यांचे हे वक्तव्य ऐकून ताकाइची यांच्या चेहऱ्यावरील हलके हास्यच नाहीसे झाले. भुवया उंचावल्या. दोघे संध्याकाळी पुन्हा हसताना दिसले. 

Web Title : ट्रंप ही शांति ला सकते हैं: जापानी पीएम का दावा

Web Summary : जापानी पीएम का मानना है कि ट्रंप तनाव के बीच वैश्विक शांति स्थापित कर सकते हैं। व्हाइट हाउस में मुलाकात के दौरान समुद्री सुरक्षा और ईरान के परमाणु कार्यक्रम पर चर्चा हुई। ट्रंप की पर्ल हार्बर टिप्पणी से वे हैरान थीं।

Web Title : Trump Alone Can Bring Peace: Japanese PM's Bold Claim

Web Summary : Japanese PM believes Trump can establish global peace amid tensions. She reaffirmed commitment to strong ties during a White House meeting, discussing maritime security and Iran's nuclear program. Trump's Pearl Harbor remark surprised her.