अरब इमिरेट्सच्या विमानातील प्रवासी आजारी...अमेरिकेकडून सावधगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 21:23 IST2018-09-05T21:21:55+5:302018-09-05T21:23:25+5:30

numerous ill passengers aboard from Arab Emirates plane | अरब इमिरेट्सच्या विमानातील प्रवासी आजारी...अमेरिकेकडून सावधगिरी

अरब इमिरेट्सच्या विमानातील प्रवासी आजारी...अमेरिकेकडून सावधगिरी

न्यूयॉर्क : दुबईहून न्यूयॉर्कला पोहोचलेल्या अरब इमिरेट्सच्या विमानाला केनेडी विमानतळावर बाजुला करण्यात आले आहे. या विमानातील 10 प्रवासी आजारी असल्याने अमेरिकेने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. न्यूयॉर्कच्या महापौरांचे प्रवक्ते एरिक फिलिप्स यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहेत. 




विमानाच्या पायलटने सांगितले की काही प्रवाशांना खोकल्याचा त्रास होत होता. तर काहींना 100 डीग्रीपर्यंत ताप होता. आजारी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक विमानतळावर पाठिवण्यात आल्याचे फिलिप्स यांनी म्हटले आहे. या विमानाने दुबईहून उड्डाण केले होते. यानंतर ते मक्केला उतरले होते. मक्केला फ्लूने धुमाकुळ घातला आहे. 
 

Web Title: numerous ill passengers aboard from Arab Emirates plane